जय शिवराय ! ग्रामपंचायती-जिल्हा परिषदांमध्ये 6 जूनला साजरा होणार शिवस्वराज दिन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ग्रामीण भागात अजूनही कोरोनाचा कहर दिसून येत आहे. तसेच तिसऱ्या लाटेचा धोका असल्यामुळे सरकारने १५ जूनपर्यंत निर्बंध वाढवले आहेत. असे असताना देखील रस्त्यावर मात्र वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे प्रचंड गर्दीला कारणीभूत ठरणारे हे वाहनचालक कोरोनाला घाबरत नसल्याचेच दिसत आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून हा राज्याभिषेक दिन हा संपूर्ण राज्यात शिवस्वराज्य दिन shivswarajya day म्हणून साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी दिली.

भाजपच्या सत्तेत येण्याच्या विधानांचा नवाब मलिकांकडून समाचार, ‘…म्हणून भाजपकडून सत्तेत येण्याची तारीख पे तारीख’ (व्हिडीओ)

तसेच, या दिवशी राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारून अभिवादन करण्यात येईल, असं ही मुश्रीफ यावेळी म्हणाले. ६ जून १६७४ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या दिनाचे महत्त्व आणखी दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ shivswarajya day म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे.

READ ALSO THIS :

कोविड-19 ची व्हॅक्सीन तुम्हाला किती काळापर्यंत सुरक्षित ठेवू शकते?, जाणून घ्या

Pune : डेक्कन परिसरातील एका शाळेच्या मैदानावर तरुणाचा खून

सुबोधकुमार जयसवाल यांच्या चौकशीचा निर्णय मुंबई पोलिसांचा अखेर रद्द

पिंपरी : शिवीगाळ केल्याच्या रागातून भर रस्त्यात दगडाने ठेचून खून !