रिकाम्या स्टेडियममध्ये खेळणं म्हणजे ‘नवरी’ शिवाय लग्न करणं, पाकिस्तानच्या ‘या’ माजी खेळाडूचं वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुर्ण जग सध्या कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनचे पालन करत आहे. काही ठिकाणी सूट देण्यात आली आहे. त्याचबरोबर काही देशांमध्ये कडक नियम लागू करण्यात आले आहे. अशामध्ये खेळाच्या आयोजनांवर आताही संकट फिरत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे गर्दी करणे धोकादायक ठरु शकते. त्यामुळे परिस्थिती सामान्य झाल्यानंतरही क्रिकेट सीरिज किंवा स्पर्धा रिकाम्या स्टेडियममध्ये घेण्याचा विचार केला जात आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचे असे म्हणणे आहे की, रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळणे म्हणजे वधूशिवाय लग्न करण्यासारखे आहे.

कोविड 19 साथीच्या आजारामुळे जवळजवळ सर्व खेळ रिकाम्या स्टेडियममध्ये घेण्याचा विचार केला जात आहे. भविष्यात कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी, दर्शकांना घरूनच खेळाचा आनंद घ्यावा लागेल. माजी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर हॅलो लाइव्हवर बोलताना म्हणाला की, ‘रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळणे म्हणजे वधूशिवाय लग्न करण्याप्रमाणे आहे.

आम्हाला कोणताही सामना खेळण्यासाठी गर्दी आवश्यक आहे. मी अपेक्षा करतो की, या वर्षाच्या शेवटी कोरोनामुळे झालेली ही परिस्थिती सामान्य होईल.’ यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीही रिकाम्या स्टेडियममध्ये सामने खेळण्याविषयी बोलला होता. तो म्हणाला होता की, रिकाम्या स्टेडियममध्ये खेळणे खूप कठीण होईल. प्रेक्षकांशिवाय भरलेल्या स्टेडियममध्ये येणारा उत्साह आणणे कठीण होईल.