‘स्वच्छ भारत’वर भडकला शोएब अख्तर

दुबई :  पोलीसनामा ऑनलाईन 

आशिया चषकची १४ वी स्पर्धा दुबई येथे सुरु आहे. ठरावानुसार स्पर्धा भारतात होणार होती पण भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील राजकीय वादविवाद आणि दोन्ही देशांच्या सिमेवरील भीषण तणावामुळे स्पर्धा संयुक्त रब अमिरातीतील  दुबई येथे हलविण्यात आली. या तणावामध्ये आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर आणि चॅनलची न्यूज अँकर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झालेली दिसली. ‘स्वच्छ भारत’ शब्दावरून  शोएब अख्तरचा पारा चढला आणि त्याने भारतीय न्यूज अँकरला उलट उत्तर दिले.

पंतप्रधान मोदीही या समस्येने आहेत त्रस्त

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6dd368db-c225-11e8-85e4-f7c16ad8c75b’]

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच. या सामन्याचे समीक्षण करण्यासाठी दोन्ही देशांमधील माजी खेळाडूंना वाहिनींवर बोलावण्याची परंपरा आहे. आपला संघ कसा वरचढ आहे, हे सांगण्यात माजी खेळाडूंमध्येही अनेकदा जुंपलेली पाहायला मिळाले आहे. यावेळी मात्र खेळाडू आणि चॅनलची न्यूज अँकर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झालेली दिसली.

आशिया चषक स्पर्धेतील अंतिम चार  गटातील सामन्यापूर्वी अख्तरला बोलावण्यात आले होते त्यावेळी न्यूज अँकरने साखळी गटातील पराभवाची आठवण करून देताना वापरलेल्या ‘स्वच्छ भारत’ या शब्दावर अख्तरचा राग अनावर झाला.  शोएब अख्तरशी बोलताना ती म्हणाली,” भारतात स्वच्छता अभियान सुरू आहे आणि भारतीय क्रिकेट संघाने ते फारच मनावर घेतलेले दिसत आहे.

[amazon_link asins=’B07418TNB1,B07B6DM75J,B076H51BL9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7615f8c9-c225-11e8-bc52-6ff12d44bccc’]
अँकरच्या या वाक्यावर अख्तरने नाराजी प्रकट केली. तो म्हणाला,” मला तुझे नाव माहित नाही. तरीही मी तुझा आदर करतो आणि मर्यादेत राहुन तु मला प्रश्न विचार, मी त्याचे नक्की उत्तर देईन. धुलाई होगी आणि स्वच्छता होगी असे शब्द तु वापरत असशील तर मी त्यावर उत्तर देणार नाही. मी येथे क्रिकेटशी निगडीत प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आलो आहे.”
क्रिकेट जगतात सर्वाधिक वेगवान गोलंदाज  म्हणून परिचित असलेला अख्तर   २०११ च्या  विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे .