पाकिस्तानच्या बहुतांश मॅच ‘फिक्स’ होत्या ; शोएब अख्तरचा खळबळजनक ‘गौप्यस्फोट’!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने मॅच फिक्सिंगबाबत एक खळबळजनक खुलासा केला आहे. शोएब अख्तरने पाकिस्तानच्या क्रिकेट संघाची पोलखोल केली आहे. शोएबने खुलासा केली की मी 21 क्रिकेटपटूंच्या विरोधात खेळत होतो, त्यातील 11 प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू होते तर 10 माझ्याच संघातील खेळाडू होते.

पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू शोएबने आपल्याच संघातील काही खेळाडूंवर मॅच फिक्सिंगचा आरोप लावला आहे. मोहम्मद आमीर आणि मोहम्मद आसिफ यांच्यावर देखील इंग्लंडमधील स्पॉट फिक्सिंगची प्रकरणे आहेत, त्यानंतर त्यांच्यावर आयसीसी आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून कठोर कारवाई करण्यात आली होती.

‘रिवाइंड विथ समीना पीरजादा’ या कार्यक्रमात बोलताना शोएब म्हणाले की मी कधीच पाकिस्तानला धोका दिला नाही. मी कधीही मॅच फिक्सिंग केले नाही. सट्टेबाज माझ्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करायचे, परंतू मी त्यांना भीक घातली नाही. पाकिस्तानचे बहुतांशी सामने फिक्स होते. संघातील कोणता खेळाडू मॅच फिक्सिंग करत होता, हे मला समजत नव्हतं.

मला पाकिस्तानचे सामने कसे फिक्स होतात, हे मला पाकिस्तानच्या एका खेळाडूने मोहम्मद आसिफ याने सांगितले होते. आसिफने बऱ्याच सामन्यांत फिक्सिंग केले होते. हे सामने कसे फिक्स केले जातात हे देखील त्याने मला सांगितल्याचा गौप्यस्फोट शोएब अख्तरने केला. या आरोपाने किक्रेट विश्वात खळबळ उडाली आहे.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या