COVID-19 : शोएब अख्तरची भविष्यवाणी – ‘पुढील एक वर्ष नाही होणार क्रिकेट, गोलंदाज नाही करू शकणार ‘हे’ काम’

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर म्हणाली की, कोरोना विषाणूच्या साथीमुळे पुढील एक वर्ष जगात कुठेही क्रिकेट खेळले जाईल, असे मला वाटत नाही. रावलपिंडी एक्स्प्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या अख्तर याने सांगितले की, किती लोक या विषाणूमुळे पीडित आहेत हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा खेळ होणार नाही. अख्तर याने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, ‘जर तुम्ही मला विचारले तर मला माहित नाही की कोरोना व्हायरस किती काळ टिकेल. जोपर्यंत हे समजत नाही की, किती लोक यामुळे पीडित आहेत तोपर्यंत कोणीही कुठेही कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळू शकत नाही.’

तो म्हणाला की, ‘कोरोना विषाणूमुळे मी पुढच्या एका वर्ष क्रिकेट खेळताना दिसणार नाही. मी पाहत आहे की, व्हायरस एक वर्षासाठी आपल्याला त्रास देईल. हा संकटाचा काळ आहे. मी आशा करतो की, आपण यातून लवकर बाहेर पडू.’ 44 वर्षाच्या अख्तर याने सांगितले की, सामन्यादरम्यान चेंडू चमकविण्यासाठी गोलंदाज थुंकीचा वापर करतील असे मला वाटत नाही.’

अख्तर म्हणाला की, ‘मला वाटत नाही की चेंडूवर कोणी थुंकी लावेल. आम्ही गोलंदाज म्हणून चेंडू चमकण्यासाठी थुंकी लावतो. बॉल पार्कमध्ये प्रत्येकाच्या हातात जातो. मी आयसीसीचा अहवाल पाहिला ज्यामध्ये असे म्हटले होते की, गोलंदाज आता चेंडूवर थुंकी लावू शकणार नाहीत. क्रिकेट हा एक असा खेळ आहे ज्यामध्ये आपल्याला आपले शरीर जवळ आणावे लागते. आयसीसीने बॉलवर थुंकी लावण्याबाबत नवा कायदा केला आहे तर मी कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या निर्णयाचे स्वागत करतो.’

शोएब अख्तर म्हणाला की, चेंडू चमकविण्याचे मुख्य कारण म्हणजे सामन्यादरम्यान चेंडूसह काही स्विंग करणे शक्य होते. कोरोनामुळे प्रीमियर लीग, ला लीगा या फुटबॉल स्पर्धाही स्थगित आहेत. आतापर्यंत कोणाला स्पर्धा कधी सुरू होईल हे माहित नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like