‘शिळया कडीला ऊत’ ! शोएब अख्तरकडून अभिनेत्री सोनाली बेंद्रेबाबत धक्‍कादायक ‘गौप्यस्फोट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – क्रिकेटच्या मैदानात आपल्या वेगवान गोलंदाजीने फलंदाजाला घाम फोडणारा शोएब अख्तरकडून एका मुलाखतीत एक खुलासा झाला आहे ज्याचा संबंध अभिनेत्री सोनाली बेंद्रेशी आहे. तुम्हाला माहीत नसेल परंतु शोएब अख्तरला सोनाली बेंद्रेचं अपहरण करायचं होतं असं खुद्द शोएबने सांगितलं आहे.

शोएबने सांगितले की, तो भारत दौऱ्यावर असताना त्याची ओळख अ‍ॅक्ट्रेस सोनाली बेंद्रे सोबत झाली. शोएब सांगतो की, सोनालीला पाहताच तो सोनालीच्या प्रेमात पडला. तिचा तो फॅनही आहे. विशेष म्हणजे सोनालीचा इंग्लिश बाबू देसी मॅम हा सिनेमा पाहिल्यानंतर शोएब सोनालीचा खूप मोठा फॅन झाला असे शोएब म्हटला. त्याच्या खोलीतही सोनालीचे पोस्टर असायचे. या शिवाय तो सोनालीचा फोटो पाकिटातही घेऊन फिरायचा असा चिकत करणारा खुलासा शोएबने मुलाखतीत केला.

आणखी एक खुलासा शोएबने केला आहे. जो वाचून तुम्ही चकित व्हाल. पहिल्याच भेटीत क्लीन बोल्ड होणाऱ्या शोएबने हा विचार आधीच केला होता की, सोनालीने जर नकार दिला तर काय करायचे. तुम्हाला सांगू इच्छितो की, जर सोनालीने नकार दिला तर तिचे अपहरण करायचे. असा विचार त्याने केलेलाच होता. या सर्व गोष्टींचा शोएबने मस्करीतच खुलासा केला होता.

परंतु याबाबत सोनालीला प्रतिक्रिया विचारली असता, तिने जे उत्तर दिले ते ही तुम्हाला चकित करेल. सोनालीला विचारले असतात ती म्हटली की, “शोएब अख्तर नावाच्या कोणत्याही पाकिस्तानी क्रिकेटपटूला मी ओळखत नाही.” सोनालीने सांगितले होते की, तिला क्रिकेटमध्ये फारसं स्वारस्य नाही. त्यामुळे तिला खेळाडूंची नावे माहिती नाहीत असे तिने स्पष्ट केलं.

सिने जगत –

आजही ‘या’ अभिनेत्याला मुलं घालतात लग्‍नाची मागणी, येतात अश्‍लील मेसेज्स

‘या’ टॉप ५ अभिनेत्रींचा चेहरा खुपच ‘भोळा’, ‘ती’ अभिनेत्री बॉलिवूडमध्ये नंबर २ वर, पहा सर्व फोटो

‘त्या’ कपड्यांवर मलायका अरोरा पुन्हा एकदा हॉस्पीटल ‘समोर’च दिसली, चाहत्यांमध्ये ‘नरम-गरम’ चर्चा

‘या’ 4 ‘टॉप’ अभिनेत्रींनी केलं ‘डेटिंग’, मात्र अद्यापही आहेत अविवाहीत

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like