पत्नी दीपिकाला पाठीवर बसवून अभिनेत्यानं मारले Push-Ups ! वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम : टीव्ही स्टार दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांची जोडी चाहत्यांना खास आवडते. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ अनेकदा सोशलवर व्हायरल होताना दिसत असतात. अनेकांना माहितीच असेल की शोएब फिटनेस फ्रिक आहे. सध्या लॉकडाऊनमुळं तो घरीच वर्कआऊट करत आहे. त्याचा एक व्हिडीओ समोर आला ज्यात तो पत्नी दीपिकाला घेऊन पुश अप्स मारताना दिसत आहे.

शोएबनं त्याच्या इंस्टा स्टोरीवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात शोएब पुश अप्स मारत आहे. खास बात अशी शोएबनं पत्नी दीपिकाला त्याच्या पाठीवर बसवलं आहे आणि पुश अप्स मारत आहे. दीपिकाला पडण्याची भीतीही वाटत आहे. दोघेही खूप हसत एन्जॉय करताना दिसत आहेत. शोएबचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दीपिका आणि शोएब यांची भेट ससुराल सिमर का मालिकेच्या सेटवर झाली होती. शोमध्ये दोघं ऑनस्क्रीन हसबंड वाईफ होते. नंतर शोएबनं मध्येच ही मालिका सोडली. परंतु त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली होती. शोएबच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यानं सुसराल सिमर का आणि इश्क में मरजावां अशा मालिकेत काम केलं आहे. दीपिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं ससुराल सिमर का आणि कहा हम कहा तुम अशा मालिकेत काम केलं आहे.