Shobha Bhagwat | बालभवनच्या संचालिका शोभा भागवत यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गरवारे बालभवनाच्या संचालिका (Bal Bhavan Director) आणि बालमान्सशास्त्राच्या अभ्यासिका शोभा अनिल भागवत Shobha Bhagwat (वय ७६) यांचे शुक्रवारी सकाळी राहत्या घरी निधन (Passed Away) झाले. त्यांच्या मागे मुलगी, मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे. (Shobha Bhagwat)

शोभा भागवत यांचा जन्म २९ ऑगस्ट १९९७ रोजी झाला होता. बाल मानसशास्त्राच्या अभ्यासिका असलेल्या शोभा भागवत यांनी मुलांसंबंधी अनेक पुस्तके लिहिली आहे. अनु बंदोपाध्याय यांच्या मुळ इंग्रजी पुस्तक बहुरुप गांधी याचे शोभा भागवत यांनी अनुवाद केला होता. या बालसाहित्य पुस्तकाला जवाहरलाल नेहरुंची प्रस्तावना आहे. आपली मुलं, गंमतजत्रा, गारांचा पाऊस, मुल नावचे सुंदर कोडं, विश्व आपलं कुटुंब, सारं काही मुलांसाठी अशी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. (Shobha Bhagwat)

मुलांसाठी खेळण्याचे ठिकाण असावे, या विचारातून सारसबागेसमोर गरवारे बालभवन उभारण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. बालभवनच्या माध्यमातून त्यांनी मुलांसाठीचे नवे मापदंड प्रस्थापित केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

विक्रीसाठी गांजा बाळगला, गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; साडे सात लाखांचा गांजा जप्त

पिंपरी : बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या टोळीचा दहशतवाद विरोधी पथकाकडून पर्दाफाश

नवाब मलिक महायुतीत नको, आमचा तीव्र विरोध, देवेंद्र फडणवीसांचे अजित पवारांना पत्र

हातात स्टेथोस्कोप, अंगावर ॲप्रॉन, आमदार धंगेकर डॉक्टरांच्या वेशभूषेत पोहचले विधानभवनात

इझी पे कंपनीची साडे तीन कोटींची फसवणूक, एजंटच्या साथीदारंना परराज्यातून अटक; पुणे सायबर पोलिसांची कारवाई