‘पाक’च्या सांगण्यावरुन ‘शोभा डें’नी लिहिला होता ‘सरकार विरोधी’ लेख, PAK च्या ‘उच्चपदस्थ’ अधिकाऱ्याचा दावा (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शोभा डे हे एक असे नाव आहे जे कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले असते. आता देखील त्या अशाच एका वादात सापडल्या आहेत आणि ट्विटरवर लोक त्यांना ट्रोल करत आहे. पाकिस्तानच्या उच्चायुक्तपदी काम केलेल्या अब्दुल बासित यांनी शोभा डे यांच्या संबंधित एक अजब पण खळबळजनक खुलासा केला आहे. त्यांनी दावा केला आहे की शोभा डे यांनी पाकिस्तानच्या सांगण्यावरुन सरकार विरोधात लेख लिहिला आहे.

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी बु्ऱ्हान वाणी याचा खातमा केल्यानंतर पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी शोभा डे यांच्यासह इतर अनेक पत्रकारांची भेट घेतली होती, त्यात शोभा डे या भारत विरोधी लेख लिहिण्यास तयार होत्या. एका मुलाखतीत अब्दुल बासित यांनी हा गंभीर खुलासा केला आहे. पाकिस्तान सरकारच्या सांगण्यावरुन शोभा डे यांनी बुरहान वाणी, काश्मीरची परिस्थिती यावर टीका करणारा लेख लिहिला होता.

या मुलाखतीत अब्दुल बासित म्हणाले की, मी भारतातल्या काही पत्रकारांना भेटलो मात्र त्यांनी काश्मीरबाबत लेख लिहिण्यास नकार दिला. त्याच वेळी मी शोभा डे यांची भेट घेतली. त्यानंतर मी त्यांना काश्मीर प्रश्नावर एक लेख लिहिण्याची विनंती केली जी त्यांनी मान्य केली. पाकिस्तान सरकारच्या इशाऱ्यावर शोभा डे यांनी लेख लिहिला असं आता अब्दुल बासित यांनी सांगितलं आहे.

शोभा डे यांनी पाकिस्तानच्या इशाऱ्यावर ‘Burhan Wani is dead but he’ll live on till we find out what Kashmir really wants’ हा लेख लिहल्याचा खळबळजनक दावा अब्दुल बासित यांनी केला. आता या वादानंतर त्यांच्यावर सोशल मिडियावर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like