Shobha R. Dhariwal | प्लास्टिक सर्जरीने रुग्णांना मिळाली जीवन जगण्याची नवीन उमेद – शोभा आर धारीवाल

पुणे : Shobha R. Dhariwal | आर एम डी फाउंडेशन (RMD Foundation) द्वारा मदनबाई माणिकचंद धारीवाल रुग्णालय शिरूर (Madanbai Manikchand Dhariwal Hospital Shirur) येथे अग्रवाल क्लब पुणे चॅरिटेबल ट्रस्ट (Agarwal Club Pune Charitable Trust) यांच्या संयुक्त विद्यमाने नि:शुल्क प्लास्टिक, कॉस्मेटिक आणि हँड सर्जरी शिबिर नुकतेच संपन्न झाले.त्याप्रसंगी आर एम डी फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा आर धारीवाल (Shobha R. Dhariwal) यांनी आपले मत व्यक्त केले.

महाराष्ट्र व राज्याबाहेरून जळालेले रुग्ण, जन्मता असलेले हाताचे पायाचे व शरीरावरील व्यंग ,जुळलेले वाकडी कमी जास्त बोटे ,मस व चेहऱ्यावरील वाकडे व्रण, दुभंगलेले ओठ व टाळू वाकडे नाक, कान हनुवटीचा आकारात बदल व अपघाताने आलेले व्यंग ईत्यादी प्रकारातील रुग्ण दरवर्षी या शिबिरामध्ये येतात व मोफत सर्जरीचा फायदा घेतात मागील बारा वर्षापासून हे शिबिर नियमितपणे राबवण्यात येत असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली. (Shobha R. Dhariwal)

शनिवार (दि. 7) व रविवार (दि. 8) असे दोन दिवशीय कालावधीत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते . एकूण २५० रुग्णांची तपासणी करून ७६ रुग्णांची यशस्वी सर्जरी करण्यात आली . यावेळी मागील १० वर्षांपूर्वी एका सहा महिन्याच्या मुलीचे २४ बोटं चिकटलेली होती तेंव्हा पासून तिचे उपचार चालू होते व या शिबिरामध्ये शेवटचे राहिलेले बोट यशस्वीरित्या वेगळे केल्या गेले आता ती पूर्णपणे बोटांची हालचाल करू शकते याबाबत तिने डॉक्टर चमूचे व रुग्णालयाचे उपकार कधीच विसरू शकणार नाही अशी भावना व्यक्त केली.

शिबिर यशस्वी होण्यासाठी अग्रवाल क्लब पुणे चॅरिटेबल ट्रस्टचे उमेश जालन ,
डॉ. पंकज जिंदल प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन, डॉ .सुब्रह्मण्यम ,डॉ. स्वप्ना आठवले प्लास्टिक सर्जन यांनी
तसेच मदनबाई माणिकचंद धारिवाल रुग्णालयाचे डॉ . प्रशांत केदारी बालरोग विशेषज्ञ ,
डॉ . रवींद्र चौहान ऑर्थोपेडिक सर्जन, डॉ .गुप्ता, डॉ. अरविंद जैन, वंदना सागवेकर, आयसीयू स्टाफ, नर्स यांनी
प्रयत्न केले .

Web Title :-Shobha R Dhariwal | Madanbai Manikchand Dhariwal Hospital Shirur plastic surgery gives new hope to patients RMD Foundation shobha r dhariwal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Thane ACB Trap | 20 हजाराची लाच घेताना 2 पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Uorfi Javed | उर्फी जावेदचं मॉब लिंचिंग होण्यीची शक्यता, धमकी देणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर कारवाई करा; अ‍ॅड. नितीन सातपुतेंची महिला आयोगाकडे तक्रार

Nashik Graduates Constituency Election | सुधीर तांबेनी पक्षाला फसवलं, सत्यजीतला पाठिंबा नाही; नाना पटोलेंनी स्पष्ट केली भूमिका