Shobha R Dhariwal | विद्यार्थ्यांना संगणकाचे तांत्रीक प्रशिक्षण मिळणे काळाची गरज – शोभा आर धारीवाल

पुणे : Shobha R Dhariwal | विद्यार्थ्यांना शालेय जीवनात दैनंदिन पाठ्यपुस्तकातील शिक्षणासोबतच कौशल्यपर, संगणकाचे तांत्रीक प्रशिक्षण (Computer Technical Training) मिळणे गरजेचे आहे आजचे युग हे संगणक युग आहे त्यामुळे संगणकाचे ज्ञान शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना देण्यात यावे असे मत रसिकलाल माणिकचंद धारीवाल फाऊंडेशनच्या (Rasiklal Manikchand Dhariwal Foundation) उपाध्यक्षा शोभा आर धारीवाल यांनी औरंगाबाद येथील जैन शिक्षण संस्था (Jain Institute of Education) संचलित पी. यु. जैन प्राथमिक विद्यालयाच्या (P. U. Jain Primary School) भेटीच्या वेळी व्यक्त केले.

या प्रसंगी त्यांनी या विद्यालयास संगणक लॅब (Computer Lab) उभारण्यासाठी
रसिकलाल माणिकचंद धारीवाल फाऊंडेशन (RMD Foundation) तर्फे पंधरा लक्ष रुपयाचा निधी देण्यात येत असल्याची घोषणा केली.
त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला तसेच जीवनात आनंदी राहण्यासाठी शाकाहाराचे महत्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना समजावून सांगितले.
याप्रसंगी जैन शिक्षण संस्थाचे अध्यक्ष महावीर सेठी (Mahaveer Sethi),
उद्योगपती प्रकाशचंद अजमेरा (Prakashchand Ajmera), तरुण सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटणी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Web Title :- Shobha R Dhariwal | The need of the hour for students to get technical training in computers – Shobha R Dhariwal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा