Shobha Rasiklal Dhariwal | ‘श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर देवस्थानाचा जीर्णोद्धार लवकरच पूर्ण करणार’ – शोभाताई आर धारीवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shobha Rasiklal Dhariwal | पुण्यातील शिवाजी नगर येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर हे प्राचीन काळातील प्रसिद्ध देवस्थाना पैकी एक आहे . याठिकाणी स्वयंभू शंकराची पिंड असून देव्हाराचे बांधकाम दगडी तर सभागृहाचे मोठे खांब सागाच्या लाकडापासून बनविलेले आहे. याच मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी शाईस्तेखानावर आक्रमण करण्यापूर्वी मुक्काम केला होता त्यामुळे याला ऐतिहासिक महत्वही आहे, मुळा मुठा नदी किनारी हे मंदिर असून मंदिराचा घाट अहिल्याबाई होळकर यांनी बांधला होता असे असूनही हे धार्मिक व ऐतिहासिक स्थळ दुर्लक्षीत झाले आहे मात्र या देवस्थानाचा जीर्णोद्धार लवकरच पूर्ण करून पुन्हा त्याला नवीन उभारी देऊ तसेच जीर्णोद्धार करतांना पुरातन वास्तूचे जतन केल्या जाईल अशी माहिती आर एम धारीवाल फाऊंडेशनच्या (R.M. Dhariwal Foundation) उपाध्यक्षा शोभाताई आर धारीवाल (Shobha Rasiklal Dhariwal) यांनी दिली.

सभामंडप ,नगारा खाना , ढोलताशा पथकासाठी सभागृह , पखवाज वादन प्रशिक्षण, व अभ्यासिका इत्यादी बाबींचा यामध्ये समावेश करण्यात आला असून अग्रीम स्वरूपातील धनादेश नुकताच देवस्थानाचे विश्वस्त यांना सुपूर्त करण्यात आला आहे. (Shobha Rasiklal Dhariwal)

या प्रसंगी देवस्थानाचे अध्यक्ष हनुमंत बहिरट पाटील, सचिव सुधीर मारोती दुर्गे ,खजिनदार शशिकांत सुरेश भोसले ,
विश्वस्त महेश चंद्रकांत दुर्गे, संजय भिमसेन सातपुते उपस्थित होते.

Web Title :- Shobha Rasiklal Dhariwal | ‘Shri Vridheshwar Siddheshwar Temple renovation will be completed soon’ – Shobhatai R Dhariwal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा