Shobhatai Rasiklal Dhariwal | शोभाताई आर धारीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री मदनबाई धारीवाल रुग्णालयास सुसज्ज रुग्णवाहिकेचे लोकार्पण

पोलीसनामा ऑनलाइन – Shobhatai Rasiklal Dhariwal | रसिकशेठ धारीवाल यांच्या वडिलांना वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता मात्र अशी वेळ कोणावरही येऊ नये यासाठी रसिकशेठ धारीवाल यांनी आर एम डी फाऊंडेशन द्वारा सर्वसामान्य लोकांसाठी मातोश्री मदनबाई धारीवाल रुग्णालयाची शिरूर येथे स्थापना केली होती व आज या रुग्णालयास सर्व सोयीयुक्त व २४ x ७ सेवा कार्डिओ रुग्णवाहिका सोपवितांना आनंद होत आहे अशी भावना शोभाताई आर धारिवाल यांनी त्यांच्या जन्मदिन सोहळ्याच्या निमित्ताने माणिकचंद स्कायवन कल्याणी नगर येथे रुग्णवाहिका लोकार्पण वेळी व्यक्त केली . यावेळी जान्हवी धारीवाल बालन (Janhavi Dhariwal Balan) अध्यक्षा आर एम डी फाऊंडेशन (RMD Foundation) उपस्थित होत्या. (Shobhatai Rasiklal Dhariwal)

 

आर एम डी फाऊंडेशन द्वारा शोभाताई आर धारीवाल यांच्या जन्मदिनामित्त दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्यात आला होता, यामध्ये कासारी गावातील रसिकलाल माणिकचंद धारीवाल जुनिअर कॉलेजचे तसेच शोभाताई रसिकलाल धारीवाल वसतिगृहाचे विद्यार्थी व विद्यार्थिनीनी वृक्षदिंडी काढून १००१ वृक्षलागवड केली तर लोणी धामणी गावातील माजी विद्यार्थी विकास प्रबोदिनी संस्थेचे सर्व आजी- माजी विद्यार्थी व गावकरी, शेतकरी,व्यापारी मिळून डोंगरभागात ३००० पेक्षा जास्त वृक्षांची लागवड करण्यात आली. (Shobhatai Rasiklal Dhariwal)

 

Shobhatai Rasiklal Dhariwal | Dedication of well equipped ambulance to Matoshri Madanbai Dhariwal Hospital on the occasion of Shobhatai R Dhariwal's birthday

 

या गावातील व आजूबाजूच्या गावातील विद्यार्थ्यांना शाळेत पोहचण्याची सोय व्हावी म्हणून “सौ शोभाताई आर धारीवाल स्कूल बस” व
रुग्णांच्या सेवेकरिता रुग्णवाहिका देण्याची घोषणा पुनीत बालन (Punit Balan) अध्यक्ष इंद्राणी बालन फाऊंडेशन (Indrani Balan Foundation) यांनी यावेळी केली.
आर एम डी इंग्रजी शाळा कोंढवा येथे वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले…
जन्मदिनाच्या शुभेच्छा सोहळा प्रसंगी विविध वृत्तप्रतिनिधी , सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी , विविध शाळा – महाविद्यालयाचे शिक्षक मुख्याध्यापक वृंद उपस्थित होते.

 

Web Title :- Shobhatai Rasiklal Dhariwal | Dedication of well equipped ambulance to Matoshri Madanbai Dhariwal Hospital on the occasion of Shobhatai R Dhariwal’s birthday

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा