साताऱ्यात उदयनराजेंना ‘धक्का’ ! श्रीनिवास पाटील ‘आघाडी’वर

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्राचं संपूर्ण लक्ष हे विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आहे. राज्यात विधानसभेसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणूकही पार पडली. मतदानानंतर लक्षात आले होते की, भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्यात काटे की टक्कर होणार आहे. हे पाहणं महत्त्वाचं होतं की, भाजपवासी झाल्यानंतर साताऱ्यातील जनता उदयनराजेंच्या बाजूने उभी राहिल का ? मिळालेल्या आकेडवारीनुसार साताऱ्यातून उदयराजे भोसले हे पिछाडीवर आहेत तर श्रीनिवास पाटील 2000 मतांनी पुढे आहेत.

साताऱ्यातील श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेदरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भर पावसात सभा घेतली. त्यांच्या या कष्टांच चीज होत असल्याचं आणि पावसातील सभेचं मतात रुपांतर होताना दिसत आहे अशी होताना दिसत आहे.

टीप : हा अंतिम निकाल नाही. आणखी मतमोजणी चालू असून अजून अनेक फेऱ्या बाकी आहेत

Visit : Policenama.com