दुर्मिळ प्रजातीचा पिवळा बेडूक पाहून आश्चर्यचकित झाले लोक, विषारी असल्याचा लावतायेत ‘तर्क’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मध्य प्रदेशातून एक आश्चर्यकारक व्हिडिओ समोर आला आहे. प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील तलावामध्ये दुर्मिळ प्रजातींचे शेकडो बेडूक बाहेर पडत आहेत. हे पिवळे बेडूक पाहून शेतकरी आपापल्या नुसार अंदाज बांधत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने गडद पिवळ्या बेडूकांना पाहून सामान्य लोकांना ते विषारी असण्याची भीती वाटत आहे आणि लोक घाबरुन पळून जाऊ लागले. त्यांना ठार मारण्याचा प्रयत्नही करण्यात आला.

माहिती नसतानाही लोक या दुर्मिळ प्रजातीच्या बेडकास विषारी मानत आहेत, तर पर्यावरणीय जाणकारांचा विश्वास आहे की, बेडकाची ही दुर्मिळ प्रजाती भारतात आढळणारी इंडियन बुल फ्रॉग आहे, जी पुनरुत्पादनाच्या वेळी त्याचे रंग बदलते. यामुळे लोक हे विषारी मानतात तर हे बेडूक अजिबात विषारी नाहीत. पर्यावरणविद् आलोक तिवारी म्हणाले की, दुर्मिळ प्रजातींचा हा इंडियन बुल फ्रॉग शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून पर्यावरणपूरक देखील आहे. आपल्याला याची भीती वाटण्याची गरज नाही, आपल्याला ही प्रजाती जतन करण्याची आवश्यकता आहे.

याबाबत अधिक माहिती देताना आलोक तिवारी म्हणाले की, माहितीअभावी आणि अज्ञानामुळे लोक निसर्गाच्या आणि आपल्यासाठी फायद्याच्या अशा मित्रांना दुखवू लागतात. आपल्याला या बेडूकसारख्या दुर्मिळ प्राण्यांपासून घाबरण्याचे काम नाही, परंतु त्यांचे फायदे आणि माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.