फक्त पार्किंगच्या वादातून पोटच्या मुलावर रोखलं पिस्तुल, ‘क्षण’ पाहून आईला हार्ट अटॅक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील भोपाळ येथे एका धक्कादायक घटना घडली आहे. पार्किंगच्या वादातून एका व्यक्तीने १४ वर्षांचा मुलावर बंदूक रोखली. हे समोर पाहताच तेथे असलेल्या मुलाच्या ५० वर्षीय आईचा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव दीपा असे आहे. ते बैरागड परिसरातील रहिवासी होती. एक वीरुमल आहुजा नावाचा व्यक्ती त्यांच्या शेजारील घरात राहतो. बुधवारी रात्री दीपाचा अल्पवयीन मुलगा (इयत्ता ९वीचा विद्यार्थी आहे) आणि आहुजाचा जावई, मनिष ओचानी यांच्या घराच्या बाहेर गाडी पार्किंगवरून जोरदार वाद झाला. लवकरच आहूजा आणि त्याची मुलगी सोनल (ओचनीची पत्नी) देखील वादात सामील झाले. गोंगाट ऐकून दीपा आणि तिचा नवरा घराबाहेर आले आणि वाद आणखी विकोपाला गेला. अचानक ओचनीने दीपाच्या मुलाकडे बंदूक दाखविली आणि त्याला ठार मारण्याची धमकी दिली. हे थरारक दृश्य पाहून दीपाला हृदयविकाराचा झटका आला आणि ती खाली कोसळली.

दरम्यान, तिच्या कुटुंबियांनी तिला तातडीने हमीदिया हॉस्पिटलमध्ये नेले, तेथे डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले आणि आहुजा, त्याची मुलगी सोनल आणि तिचा नवरा ओचानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि दीपाचा मृतदेह पोस्टमार्टम तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. सोनलने दावा केला आहे की, तिच्या पतीने अल्पवयीन मुलाला जी बंदूक दाखविली होती ती एक खेळण्यातली बंदूक होती. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.