IT नोकरदारांना झटका, ट्रम्प यांनी H-1B वीजाधारकांना नोकरी देण्यास रोखणार्‍या आदेशावर केली स्वाक्षरी

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी संघीय एजन्सीकडून एच-1 बी वीजा धारकांना नोकरी देण्यापासून रोखण्यासंबंधी सरकारी आदेशावर हस्ताक्षर केले आहेत. हा अमेरिकेत नोकरी करण्यास इच्छुक भारतीय आयटी नोकरदारांसाठी मोठा झटका आहे. ट्रम्प यांनी संघीय एजन्सीजने अमेरिकनांना नोकरी देण्याचे निर्देश दिले आहेत. सोबतच राष्ट्रपतींनी विशेषदृष्ट्या एच-1बी वीजावाल्या परदेशी नोकरदारांसोबत करार किंवा उप करार करणे टाळवे, असे म्हटले आहे. यापूर्वी ट्रम्प प्रशासनाने 23 जूनला या महत्वपूर्ण निवडणूक वर्षात अमेरिकन कर्मचार्‍यांच्या संरक्षणासाठी एच-1 बी वीजा आणि अन्य प्रकारचे परदेशी कार्य वीजा 2020 च्या अखेरपर्यंत स्थगित केले आहेत.

एच-1बी वीजा भारतीय आयटी नोकरदारांमध्ये खुप लोकप्रीय आहे. हा एक अनिवासी वीजा आहे. याद्वारे अमेरिकन कंपन्या तंत्रज्ञान किंवा अन्य तज्ज्ञ पदांवर परदेशी कर्मचार्‍यांची नियुकती करू शकतात. अमेरिकेच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या दरवर्षी या वीजाच्या आधारावर चीन आणि भारतातून हजारो नोकरदारांना नियुक्त करतात. ट्रम्प यांनी सोमवारी व्हाईट हाऊसच्या ओवल कार्यालयात पत्रकारांना म्हटले की, आज मी एका सरकारी आदेशावर हस्ताक्षर करत आहे. यातून संघीय सरकार द्वारे अमेरिकनांना नोकरी देण्याच्या नियमाचे पालन होणार आहे. आमचे प्रशासन स्वस्त परदेशी कामगारांना घेण्यासाठी मेहनती अमेरिकनांना नोकरीतून बाहेर काढण्याची कारवाई कधीही सहन करणार नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले, आम्ही एच-1 बी च्या नियमांना अंतिम रूप देत आहोत, ज्यामध्ये आता कोणत्याही अमेरिकन कर्मचार्‍याला बदलता येणार नाही. एच-1बी चा वापर अमेरिकेला रोजगार मिळण्यासाठी होणार आहे. याचा वापर प्रमुख मोठे वेतन घेणार्‍या प्रतिभावंतांसाठी करण्यात येईल. आता याचा वापर स्वस्त कामगार तथा अमेरिकन लोकांसाठी नोकरी समाप्त करण्यासाठी करता येणार नाही. यावेळी ट्रम्प यांच्यासोबत नोकर्‍यांच्या आउटसोर्सींग विरोधात अभियान चालवणारे अनेक लोक उपस्थित होते.

यात प्रामुख्याने फ्लोरिडाच्या प्रोटेक्ट यूएस वर्कर्स ऑर्गेनायजेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा सारा ब्लॅकवेल, टेनेसी व्हॅली अथॉरिटीमध्ये सॉफ्टवेयर इंजिनियर जोनाथन हिक्स तथा पेन्सिल्वेनियाचे यूएस टेक वर्कर्सचे संस्थापक केविन लिन सहभागी होते.

अमेरिकेत एच-1बी वीजाच्या प्रत्येक आर्थिक वर्षात वार्षिक मर्यादा 65,000 ची आहे. या सरकारी आदेशांतर्गत सर्व संघीय एजन्सीना 120 दिवसांच्या आत अंतर्गत ऑडिट करून हे पाहावे लागेल की, केवळ अमेरिकन नागरिकांना आणि नागरिकत्ववाल्या लोकांसाठीच स्पर्धा सेवांमध्ये नियुक्तीच्या आवश्यक नियमांचे पालन करत आहे.