धक्कादायक ! आमदारासह कुटुंबातील ११ जणांची निर्घृण हत्या

अरुणाचल प्रदेश : वृत्तसंस्था – अरुणाचल प्रदेश मधील एका आमदारासह ११ जणांची निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना अरुणाचल प्रदेशमधील तिरापमध्ये घडली आहे. काही अज्ञात हल्लेखोरांकडून या ११ जणांची हत्या करण्यात आल्याचीही माहिती मिळते आहे. या घटनेनंतर मात्र सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

तिरोंग अबो यांच्यासह ११ जणांची हत्या
याबाबत मिळलेली अधिक महिती अशी की, ज्या ११ जणांची हत्या करण्यात आली आहे त्यामध्ये नॅशनल पीपल्स पार्टी (NNP)चे आमदार तिरोंग अबो यांचा देखील समावेश आहे. अबो हे अरुणाचल प्रदेशच्या खोंसा-पश्चिम मतदारसंघातून आमदार आहेत. अबो हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत होते. त्यांचीही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी आमदार तिरोंग अबो आणि त्यांच्या घरच्यांवर हल्ला केला. सर्वात आधी हल्लेखोरांनी अबो यांची हत्या केली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीय आणि सुरक्षा रक्षकांची हत्या केल्याची माहिती देण्यात आली आहे.

हत्येमागे नागा बंडखोर संघटनेचा हात ?
दरम्यान, हा हल्ला नागा बंडखोर संघटनेने हा हल्ला केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. नेशनल सोशलिस्ट काउंसिल ऑफ नागालँड (एनएससीएन) असं या संघटनेचं नाव आहे.

या घटनेनंतर मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी यावर संताप आणि शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.