‘ससुराल सिमर का’ मधील प्रसिद्ध १४ वर्षीय बालकलाकाराचा अपघातात मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – १४ वर्षीय बाल कलाकार शिवलेख सिंहचा अपघात झाला आहे. गुरुवारी छत्तीसगढच्या रायपूर मधील बाहरी भागात त्याची कार एका ट्रकला धडकली. या अपघातात त्याचा दुर्दैवी अपघात झाला. कार मध्ये शिवलेखसोबत त्याचे आई-वडील आणि एक तिसरा व्यक्ती देखील होता. तिघांना अपघातात गंभीर जखम झाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात गुरुवारी दुपारी ३ वाजता धारसिवा भागात झाला. कार आणि ट्रकची टक्कर झाल्यानंतर शिवलेखचा जागीच मृत्यू झाला. त्याची आई लेखना, वडील शिवेंद्र सिंह आणि तिसरा व्यक्ती जखमी आहे. शिवलेखची आई गंभीर जखमी झाली आहे.

ते सर्वजण बिलासपुरवरून रायपुरला चालले होते, आणि त्यांच्या कारसमोर ट्रक येऊन धडकली. अपघातानंतर ट्रक ड्राइव्हर ट्रक सोडून फरार झाला आहे. पोलीस ड्राइव्हरचा शोध घेत आहेत. परिवारातील नातेवाईकांनी सांगितले की, शिवलेख रायपूर मीडियाला मुलाखत देण्यासाठी चालला होता. शिवलेख छत्तीसगढ मधील राहणारा आहे. त्याचे आई- वडील १० वर्षांपासून मुंबई मध्ये राहतात. शिवलेखने अनेक हिंदी सिरियल्स मध्ये काम केले आहे. शिवलेख रिऍलिटी शो मध्येही काम करायचा.

Loading...
You might also like