बारामती : धक्कादायक ! सव्वा महिन्याच्या बालिकेला पाण्याच्या टाकीत बुडवून मारले

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – सव्वा महिन्याच्या बालिकेचा पाणी साठविण्याच्या टाकीत बुडवुन खून झाल्याची धक्कादायक घटना (shocking-15-month-old-baby-girl-was-murdred-drowning-baramati) समोर आली आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव येथे बुधवारी (दि.25 ) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस मृत बालिकेच्या आईसह तिच्या माहेरकडील व्यक्तीची कसून चौकशी करत आहेत. गरज पडल्यास नार्को टेस्ट करण्यात येणार असल्याचे समजते.

दिपाली संदीप झगडे (रा. काटेवाडी, ता. बारामती) येथील विवाहिता बाळंतपणासाठी तिच्या माहेरी माळेगाव येथे आली होती. माळेगाव परिसरातील चंदननगर येथे तिचे वडील संजय जाधव वास्तव्यास आहेत. संगीता यांनी आज या बालिकेला पाळण्यात झोपविले होते. मात्र पाळण्यातून ती बेपत्ता झाली. परिसरात तिचा शोध घेऊन देखील ती न सापडल्याने संदिप जाधव यांनी माळेगाव पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार देण्याची प्रक्रीया सुरु होती. त्याचवेळी त्या बालिकेचा मृतदेह जाधव कुटुंबियांच्याच पाणी साठविण्याच्या 500 लीटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीत आढळून आला.

घरापासून अवघ्या चाळीस फूट अंतरावर ही टाकी आहे. याच टाकीत बालिकेचा मृतदेह फुगल्याने वर आला होता. तसेच या टाकीचे झाकण बंद असल्याचे समोर आहे. दिपाली यांना यापूर्वी 6 वर्ष, 3 वर्ष वयाच्या दोन मुली आहेत. तर आज मृत्युमुखी पडलेले बालिका हे त्यांचे तिसरे अपत्य आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बालिकेचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस निरीक्षक महेश ढवाण,सहायक पोलीस निरीक्षक महेश विधाते यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

You might also like