2 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, घरातील शेतमजुराने केले कृत्य

चंद्रपूर (chandrapur) : चंद्रपूर (chandrapur) जिल्ह्यात २ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी २१ वर्षाच्या शेतमजूराला अटक केली आहे. जिल्ह्यातील जिवती या अतिदुर्गम तालुक्यातील शेणगाव येथे हा प्रकार घडला.

घरातील शेतमजुराने २ वर्षाच्या मुलीला बाहेर फिरायला घेऊन जाण्याचा बहाणा करुन तिला दुचाकीवरुन नेले. त्यानंतर या नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अत्याचार करुन घरी आणून सोडल्यानंतर हा संपूर्ण प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आला. या चिमुरडीला अगोदर जिवती व नंतर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आहे. तेंव्हा तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले.

याप्रकरणी रामनगर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून आकाश पवार या तरुणाला अटक केली आहे. याप्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. आरोपी आकाश पवार याला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.