धक्कादायक ! कोल्हापूरात ऑनलाइन शिकवणी समजत नसल्याने 20 वर्षीय तरुणीची आत्महत्या

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या ऑनलाइन शिकवणी वर्ग सुरु झाले आहेत. पण कोल्हापूरातील एका 20 वर्षीय तरुणीने ऑनलाइन शिकवणी वर्गात काही समजत नसल्यामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऐश्वर्या पाटील असे विद्यार्थीनीचे नाव आहे. या घटनेची करवीर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या बाबासो पाटील (वय 20) ही एका फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शिकवण्याचे वर्ग ऑनलाइन सुरू होते. पण ऑनलाइन शिक्षण ऐश्वर्याला जमत नव्हते. त्यामुळे आठवडाभरापासून ऐश्वर्या अस्वस्थ व निराश होती. याच नैराश्यातून तिने राहत्या घरातील पंख्याला साडीने गळफास घेतला.हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. नातेवाईकांनी उपचारासाठी ऐश्वर्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.