‘कोरोना’मुळे चीनमध्ये 8 कोटी लोक बेरोजगार !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – जगभरात कोरोना व्हायरसचा वेग वाढत असून सर्वाधिक परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. त्यामुळे चीनमध्ये लाखो लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. चीनमध्ये कोरोनाच्या जीवघेण्या आजारामुळे अनेक आठवडे मार्केटमध्ये लॉकडाऊन असल्यामुळे त्यामुळे लाखो लोकांच्या हातचे काम गेले आहे.

चीनमध्ये अधिकृत स्वरुपात बेरोजगारा आकडा नाही. गेल्या काही वर्षात हे प्रमाण 5 टक्क्यावर पोहोचले आहे. गेल्या काही दिवसात बेरोजगारीची अधिकृत संख्या वाढली आहे. एका रिपोर्टनुसार मार्च महिन्यात चीनमध्ये बेरोजगारीचा दर 5.9 टक्के इतका होता. त्यानंतर गेल्या महिन्यात हे प्रमाण 6.2 टक्के झाले आहे. यानुसार गेल्या काही दिवसांत 2 कोटी 70 लाख लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. काही तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार चीनमध्ये बेरोजगारीची संख्या खूप कमी करुन सांगतिली जात आहे.

मात्र सद्य परिस्थिती खूप कठीण आहे. चीनमध्ये तब्बल 29 कोटी प्रवासी मजूर आहेत, जे कन्स्ट्रक्शन, मॅन्यूफॅक्चरिंग आणि इतर प्रकारच्या कामाशी संबंधित आहेत. हे कमी उत्पन्न गटातील आहेत. मात्र अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी यांची भूमिका महत्त्वाची आहे. ही संख्या एकत्र केल्यास चीनमध्ये मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत तब्बल 8 कोटी लोक बेरोजगार झाले आहे.

चीन अकॅडमी ऑफ सोशल सायन्सचे एक अर्थतज्ज्ञ झँग बिन यांनी ही आकडेवारी दिली आहे. दुसरीकडे येत्या काही आठवड्यांमध्ये परिस्थिती अधिक बिघडू शकते. बीजिंगमधून तब्बल 87 लाख लोक अनेक कॉलेज व विद्यापीठातून पदवी घेऊ बाहेर पडतील. त्यांच्यासमोर नोकरीचे संकट ओढावणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.