चिंताजनक ! पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कुटुंबातील 8 जण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. पुणे शहरातील परिस्थिती अत्यंत बिकट होत जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. काल (शनिवार) पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली. त्याबद्दल महापौरांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली. आता मात्र अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून महापौर मोहोळ यांच्या कुटुंबातील 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ हे कोथरूड परिसरात रहावयास आहेत. दरम्यान, कोरोनाचं संकट आल्यापासुन ते अन्य सहकार्‍यांसोबत मिळून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युध्दपातळीवर मेहनत करीत आहेत. दरम्यान, त्यांना थोडासा ताप आला होता. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी झाली. त्यांना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या कोरोना चाचण्या केल्या गेल्या. दरम्यान, महापौर मोहोळ यांच्या कुटुंबातील तब्बल 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.