राजस्थानमध्ये भररस्त्यात शिक्षकाचे नाक व कान कापले

पोलिसनामा ऑनलाईन – प्रेम प्रकरणातून जमावाने शाळेतून घरी जाणार्‍या शिक्षकाला घेरुन त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये शिक्षक गंभीर जखमी झाला आहे. नाक व कान कापलेल्या गंभीर अवस्थेत त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.राजस्थानातील बाडमेर येथे ही घटना घडली आहे.

शाळेतून घराच्या दिशेने जाणार्‍या शिक्षकावर हत्याराने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात शिक्षकाचे नाक व कान कापून टाकण्यात आले. बाड़मेर जिल्ह्यातील भटाला गावातील घटनेमागे प्रेम प्रकरणाचे कारण सांगितले जात आहे. शिक्षकावर मुलीला पळविल्याचा आरोप आहे. शिक्षकावर ज्या लोकांनी हल्ला केला ते पळवलेल्या तरुणीचे कुटुंबीय आहे. तरुणीचे भाऊ व काही नातेवाईकांनी मिळून शिक्षकाचे नाक व कान कापले. शिक्षकाला प्राथमिक उपचारासाठी त्याचे कुटुंबीय अहमदाबाद येथे घेऊन गेले आहेत. बाड़मेरच्या रागेश्वरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.