स्टाफला फसवून विमानात केलं ‘पॉर्न’ फिल्मचं ‘शूटिंग’

मिडलँड (ब्रिटन ) : वृत्तसंस्था – म्युझियममधील विमानात सिनेमाचं शूटिंग करायचं आहे असं सांगून विमानात पॉर्न फिल्म तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर खळबळजनक घटना ब्रिटनमधील मिडलँड म्युझियममध्ये घडली आहे. म्युझियमधील विमानात सिनेमाचं शूटिंग करायचं आहे असं स्टाफला खोटं सांगून या अभिनेत्रींनी 9000 रुपये दिवसाचं भाडंही दिलं. मात्र या अभिनेत्रींनी या विमानात पॉर्न फिल्म शूट केलं. याबाबतची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.

म्युझियमधील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार , अडल्ट फिल्म या विमानात चित्रित केली जाणार आहे. याविषयी कोणतीही पूर्वकल्पना आम्हाला देण्यात आली नव्हती. अभिनेत्रींनी फक्त Vickers Viscount विमानात स्विमवियर सिनेमा शूट करण्यासाठी आले असल्याचं सांगितलं होतं. अशा प्रकारचं शूटिंग केलं जाणार आहे याची पूर्व कल्पना असती तर आम्ही म्युझियममध्ये शुटिंगला परवानगीच दिली नसती. किंवा असं काही सुरू आहे याची जराही कल्पना आली असती तरी शूटिंग थांबलं असतं.

या अभिनेत्रींनी शूटिंगसाठी पायलटचे कपडे घातले होते. काही अभिनेत्री या एअरहॉस्टेसचे कपडे घातले होते. अशाप्रकारे पोशाख करून अनेक जण इथे शूटिंगच्या निमित्तानं येत असतात. त्यामुळे कुणाच्याच मनात असं काही होईल याबाबत जराही शंका आली नाही. आमची फसवणूक करून ही शूटिंग करण्यात आली आहे. या अभिनेत्रींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अडल्ट फिल्मचं शूटिंग करण्यासाठी वापरण्यात आलेलं विमान एकेकाळचं फ्रान्सचं असून त्या विमानाचा वापर 1950 साली चार्टर हॉलिडेसाठी करण्यात आला होता.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like