धक्कादायक ! ‘आयसोलेशन’ वॉर्डमधील तबलिगी जमातच्या लोकांकडून गैरवर्तन, वैद्यकीय कर्मचार्‍यांवर थुंकले

नवी दिल्ली  :  वृत्तसंस्था  –   दिल्लीतील निझामुद्दीन येथील मरकज कार्यक्रातून आलेले तबलीगी जमातीचे लोक त्यांच्या तपासणी आणि उपचारांसाठी डॉक्टरांना सहकार्य करत नसल्याचे समोर आले आहे. तबलीगी जमातीचे लोक डॉक्टर आणि स्टाफवर थुंकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर रेल्वेचे सीपीआरओ दीपक कुमार यांनी यासंदर्भांत माहिती दिली.

माहितीनुसार, तुकलकाबाद येथील आयसलेशनमध्ये ठेवण्यात आलेले तबलीगी जमातीचे लोक डॉक्टरांसोबत गैरवर्तन करत आहे, तसेच मेडीकल कर्मचाऱ्यांना सहकार्य करत नसून उलट सेंटरमध्ये इकडे-तिकडे फिरण्यासोबतच अनावश्यक मागण्या करत आहेत. नको तिथे थुंकत आहेत तसेच मेडीकल कर्मचाऱ्यांच्या अंगावरही थुंकत आहेत. दरम्यान, थुंकल्यामुळे कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका अनेक पटीने वाढतो. अशा परिस्थिती तबलीगी लोकांकडून गैरवर्तन करण्यात येत आहे.

दरम्यान, निझामुद्दीन येथील मरकज देशात कोरोनाचे केंद्र बनले आहे. दिल्लीत बुधवारी ३२ रुग्ण कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी २९ रुग्ण तबलीगी जमातीतून आलेले आहेत. दीपक कुमार यांनीं दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील मरकज येथून परतल्यानंतर तबलीगी जमातीच्या १६७ लोकांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. यापैकी ९७ डीजेल शेड ट्रेनिंगमध्ये तर ७० आरपीएफ बॅरेकमध्ये ठेवण्यात आले आहेत.