स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील कलाकार प्रशांत लोखंडे यांचं निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील एका अभिनेत्याचे दु:खद निधन झाल्याचे बातमी समोर आली आहे. अभिनेता प्रशांत लोखंडे याचे १४ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.

मुरुड जंजिरा किल्ल्यावर कोंडाजी बाबा यांना घेऊन जाण्यासाठी मदत अब्दुल्ला दळवी यांनी केली होती. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत अब्दुल्ला दळवी हे पात्र साकारणारा अभिनेता प्रशांत लोखंडे याचे १४ सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले. प्रशांत यांनी कमी वयात जगाचा निरोप घेतल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. तसेच उत्तम कलाकाराच्या अचानक जाण्याने मित्र परिवार व अभिनय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रशांत लोखंडेने अब्दुल्ला दळवी पात्रात “बाद में कटकट नको” म्हटलेला हा डायलॉग प्रेक्षकांनी मनात कायम ठेवला. अब्दुल्ला दळवींच्या पात्राला प्रशांतने उत्तम न्याय दिला होता.

तसेच प्रशांतने स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत बाजी प्रभू घोरपडे यांची उत्तम भूमिका साकारली होती. दोन्ही मालिकेच्या टीम कडून व जगदंब क्रिएशनच्या परिवाराकडून प्रशांत लोखंडेला श्रद्धांजली वाहण्यात आली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like