धक्कादायक ! शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची किडनी गायब

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – सोलापूरात एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुम्ही असा कधी विचारही केला नसेल. जेव्हा डाॅक्टरच पैसे उकळणारा बनतो तेव्हा मात्र सगळच अवघड होऊन बसतं. अशात तर गरिब जनतेला याची चांगलीच झळ बसते. रुग्णालयात फसवणूक होण्याचा प्रकार हा काही नवीन नाही. तुमचं ऑपरेशन झालं आणि काही दिवसांनी डॉक्टरांनी तुमची किडनीच काढली असं सत्य जर तुम्हाला समजलं तर यावर तुमची काय अवस्था होईल ? यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. परंतू असाच प्रकार सोलापूरातून समोर आला आहे. विशेष म्हणजे सराकरी रुग्णालयताली हा प्रकार असल्याचे समजत आहे.

एका महिलेने सोलापूरातील एका नावाजलेल्या रुग्णालयात ऑपरेशन केले परंतु नंतर त्यांना काहीसं अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी याबाबत तपासणी केली व नंतर त्यांच्या लक्षात आलं की, त्यांची उजवी किडनी काढून घेण्यात आली आहे.

सुनीता इमडे या महिलेचं नाव आहे. 2016 मध्ये पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानं आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या सुनीता इमडे या सोलापुरातील नावाजलेल्या अश्विनी रुग्णालयात ऍडमिट झाल्या. आजार मोठा आहे असं म्हणत डॉक्टरांनी ऑपरेशन तर केलं मात्र सुनीतांचं अख्खं आयुष्यचं आता अधू झालं आहे. ऑपरेशननंतर वारंवार अस्वस्थ वाटू लागल्यानं सुनीता एका रिचर्स फाऊंडेशनकडे गेल्या आणि त्यानंतर त्यांची उजवी किडनी नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. तर सुनीता यांना झालेल्या आजारात किडनी काढण्याचा काहीही संबंध नसल्याचं डॉ. महेश नायकुडे (अध्यक्ष – सनराईज हेल्थ अँड रिसर्च फाऊंडेशन) यांनी म्हटलं आहे.

याची गांभीर्यता लक्षात घेता सनराईस हेल्थ अँड रिचर्स फाऊंडेशननं थेट पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे दाद मागितली. त्यावर चौकशी आदेश देण्यात आल्याचं डॉ. महेश यांनी सांगितलं. कारण एकतर हे प्रकरण फारच गंभीर आहे. इतकेच नाही तर सुनीता इमडेंसारखे आणखीही रुग्ण असतील जे अशा प्रकारच्या फसवणूकीला बळी पडले असतील.

सुनीता इमडे या एकट्याच त्यांचं घर चालवतात. असे असतानाही त्यांनी स्वखर्चाने  ऑपरेशन केलं होतं अशी माहिती समजत आहे. मुख्य म्हणजे त्यांच्यावर त्यांच्या मुलाचीही जबाबदारी आहे. असे असतानाही त्यांना इतक्या दुर्दैवी घटनेला सामोरे जावे लागत आहे.

रुग्णालयानं ठेवले कानावर हात
गरज नसतानाही कोणत्या रुग्णाची किडनी काढून घेतल्याच्या आरोपामुळे अश्विनी रुग्णालय संशयाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. इतकेच नाही तर या प्रकरणावर बोलताना रुग्णालयानं कानावर हात ठेवले असल्याचे दिसत आहे. याबद्दल रुग्णालयाला काहीही माहीत नसल्याचं रुग्णालयाकडून सागंण्यात आलं आहे. परंतु असे असले तरी हे प्रकरण गंभीर असल्याने या सर्वावर लवकरात लवकर कारवाई होणे गरजेचे आहे.
पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like