धक्कादायक…लष्कराच्या डेपोतूनच AK-47 ची तस्करी

जबलपूर : वृत्तसंस्था – देशभर गाजत असलेल्या AK-47 तस्करी प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. शुकवारी NIA च्या एका टीमने जबलपूरमधल्या लष्कराच्या डेपोवर छापे टाकले. याच डेपोतून अत्याधुनिक अशा एके 47 रायफलींची तस्करी झाली होती. NIA ने ही कारवाई अतिशय गुप्त ठेवली होती. NIA च्या एका विशेष पथकाने हे छापे टाकले. यात १२ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यावेळी NIA  आपल्यासोबत या प्रकरणातला मुख्य आरोपी सुरेश ठाकूर आणि पुरुषोत्तम यांनाही सोबत आणलं होतं.
सुरेश ठाकूर हा या डेपोत स्टोअर मॅनेजर होता तर पुरुषोत्तम रजक हा लष्कराचा माजी सैनिक आहे. या डेपोतले डझनभर अधिकारी NIA च्या रडावर आहेत. पुरुषोत्तम आणि सुरेशने या अधिकाऱ्यांची नावं जबाबात घेतली होती. सुरेश हा या प्रकरणातला मुख्य मास्टरमाईंड आहे. NIA ने डेपोतलं साहित्य ताब्यात घेतलंय. स्कॉक रजिस्टरमधून काही धक्कादायक माहितीही उघड होण्याची चिन्ह आहेत.
या डेपोमधून आत्तापर्यंत ७० पेक्षा जास्त रायफल्सची तस्करी झाली आहे. येथून या रायफल्स बिहारमध्ये नेल्या जातात आणि तिथून त्या देशात विकल्या जातात. बिहारमधल्या मुंगर जिल्ह्यातल्या इरफान या आरोपीकडून पोलिसांनी AK-47 रायफल ताब्यात घेतली होती. त्यानंतर या असं रॅकेट असल्याचा खुलासा झाला होता.
या प्रकरणात आत्तापर्यंत एक डझन लोकांना ताब्यात घेतलं आहे. अजुन अनेक धक्कादाय खुलासे होणं अपेक्षीत असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय. यात लष्कराचे आजी-माजी अधिकारी आणि कर्मचारी सहभागी असल्याचं उघड झालंय. AK-47 ही अत्याधुनिक रायफल असून ती फक्त लष्करासाठीच उपलब्ध असते. इतरांना ही रायफल वापरण्यास बंदी आहे.