धक्कादायक ! अयोध्येत भरदिवसा गोळीबार, भाजप नेत्यासह दोघांचा खून

अयोध्या : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचे संकट गडद होत असातना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊन दरम्यान अयोध्येमध्ये सोमवारी (दि.18) पलिया प्रताप शाह गावात ग्राम प्रधान जय प्रकाश सिंह आणि राम पदारथ यादव उर्फ नन्हा यादव यांच्या वाद झाले. यानंतर दोघांमध्ये झालेल्या वादातून दोघांनी एकमेकांना गोळ्या घातल्या. यामध्ये दोघांचाची गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अशिष तिवारी यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत जयप्रकाश सिंह हे भाजपचे खासदार लल्लू सिंह यांचे निकटवर्तीय होते. या घटनेबाबत माहिती मिळताच लल्लू सिंह देखील घटनास्थळी पोहचले. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सध्या या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गोळीबार झाल्यानंतर जखमी झालेल्या जयप्रकाश सिंह यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. या दोघांमध्ये पूर्वीपासून वाद होते. पोलिसांकडून तपास सुरु आहे.

अयोध्येत गोळीबाराची दुसरी घटना घडली. यात महाराजगंज भागात दोन दिवसांपूर्वी मंशाराव यादव यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. तसेच त्यांचा मृतदेह रेतीमध्ये पुरून ठेवला होता. आज पोलिसांना त्यांचा मृतदेह सापडला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. सध्या देशात कोरोनासारख्या महाभयंकर आजाराने थैमान घातले आहे. यामुळे लोकांमध्ये याची भीती आहे. त्यातच अयोध्येत झालेल्या या गोळीबारामुळे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.