धक्कादायक… लग्नाच्या पहिल्या रात्री पतीसह घरातील सर्व पुरुषांनी केला बलात्कार

कुरुक्षेत्र : वृत्तसंस्था
नवविवाहितेवर पती, दिर आणि चार तांत्रिकांनी लग्नाच्या पहिल्याच रात्री सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १२ सप्टेंबरला या मुलीचे लग्न झाले आणि १३ सप्टेंबरला लग्नाच्या पहिल्या रात्री तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. याबाबत कुठे वाच्यता केली तर ठार करू अशी धमकी या सगळ्यांनी तिला दिली होती. मात्र या मुलीने तेथून पळ काढला आणि वडिलांना सगळा प्रकार सांगितला. मुलीने धाडस दाखवत या सगळ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे आणि या सगळ्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशीही मागणी केली आहे. हरयाणातील कुरुक्षेत्रमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’58db58a1-c3e4-11e8-a12f-d774aab64d18′]
१३ आणि १४ सप्टेंबरच्या रात्री आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे पीडित महिलेने म्हटले आहे. पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यासंबंधीचा अहवाल येणे बाकी आहे अशीही माहिती पोलिसांनी दिली.१३ सप्टेंबरला लग्नाची पहिली रात्र असल्याने ही पीडित महिला तिच्या पतीसोबत एका खोलीत गेली. काही वेळाने तिचा सासरा आणि दिरही तिथे आले. त्यांनी तिला सरबत प्यायला दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १४ तारखेला सकाळी आपल्यावर बलात्कार केल्याचे या महिलेला समजले ज्यानंतर तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’58db58a1-c3e4-11e8-a12f-d774aab64d18′]
मात्र तिची सासूने आणि नणंदेने तिला मारहाण केली आणि एका खोलीत कोंडून ठेवले. त्या रात्री पुन्हा तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. या सगळ्या घटनेमुळे हादरून गेलेल्या पीडितेने घरात कोणी नाही हे पाहून पळ काढला आणि थेट आपले माहेर गाठले. वडिलांना सगळा प्रकार सांगितला ज्यानंतर तिने आणि तिच्या वडिलांनी सासरच्यांविरोधात आणि मांत्रिकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या घटनेमागे काही तंत्रविद्या, काळ्या जादूचा संबंध असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
जाहिरात
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’58db58a1-c3e4-11e8-a12f-d774aab64d18′]