पाकच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकलेल्या भारतीय जवानाने फोडली गुप्त माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय सैन्यातील एका जवानाने पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाकच्या हनी ट्रॅपमध्ये हा जवान अडकला असून त्याला इंटेलिजेंस ब्यूरो (IB), मिलिट्री इटेलिजेंस आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करून जवानाला अटक केली.

एनआयएने दिलेल्या वृत्तानुसार अटक करण्यात आलेला भारतीय जवान सैन्यामध्ये लिपीक पदावर काम करत होता. तो मध्य प्रदेशच्या महू कॅन्टोन्मन्टमध्ये इन्फंट्री बटालियनमध्ये कार्यरत होता.

संयुक्त कारवाई केल्यानंतर पोलिसांनी  त्याच्याकडून जवानाचा मोबाईल आणि अन्य साहित्य ताब्यत घेतले आहे. त्याच्याकडे चौकशी सुरु करण्यात आली असून त्याच्या मोबाईल आणि इतर साहित्य तपासण्यात येत आहे. जप्त केलेल्या मोबाईमधून महत्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्याता आहे. देशात अशा प्रकारची अनेक प्रकरणे यापूर्वी समोर आली आहेत.
https://twitter.com/ANI/status/1129009498138583040

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like