धक्कादायक……बीडमध्ये शिवीगाळ केल्याच्या रागातून पोलीस कर्मचाऱ्याचीच केली हत्या

बीड : पोलीसनामा आॅनलाईन

केवळ शिवीगाळ केल्याच्या रागातून एकाने रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नागनाथ मुंंडे असे हत्या झालेल्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. सदरची घटना रविवारी (दि.२४) सकाळी अंबाजोगाई रोडवरील एका हाॅटेलजवळ घडली असून, रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचीच हत्या करण्यात आल्यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाच तपास अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा आणि दरोडा प्रतिबंधक पथकाने अवघ्या 12 तासात करुन आरोपीला गजाआड केले आहे. यामध्ये दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’24bf9914-7890-11e8-9b4d-e1aa3a7e9ebe’]

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मयत रेल्वे कर्मचारी नागनाथ मुंडे शनिवारी (दि. 23) रात्री परळी बस स्थानकासमोर आले होते. तेथून त्यांनी एका रिक्षा चालकाला रेल्वे स्टेशनला सोडण्यास सांगितले, मात्र रेल्वे स्टेशन जवळ असल्याने रिक्षा चालकाने त्यांना सोडण्यास नकार दिला. त्याने मुंडे यांना चालत जाण्यास सांगितले. परंतू मुंडे यांना याचा राग आला त्यामुळे त्यांनी रिक्षा चालकांना शिवीगाळ केली. मुंडे यांच्या या वागण्याचा राग आल्यामुळे रिक्षा चालकांनी मुंडे यांना मारहाण केली. मारहाणीनंतर त्यांचे समाधान न झाल्याने दोघांनी मुंडे यांना रिक्षात बसवून अंबाजोगाई रोडवरील सपना बार समोरील मोकळ्या जागेत नेऊन मारहाण केली. रस्त्यावरील सिमेंट ब्लाॅक असलेला पीव्हीसी पाईप आणून त्यांनी मुंडेंच्या डोक्यात घातला. या मारहाणीत मुंडे यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर दोन्ही आरोपी रिक्षा घेऊन फरार झाले.

रिक्षा टायरच्या निशाणीमुळे लागला प्रकरणाचा छडा

सदर प्रकरणाचा तपास पोलीस करत असताना  मृतदेहाजवळ टायरचे निशाण आढळून आले. याच पुराव्याच्या बळावर पोलिसांनी सर्व तपास रात्री रिक्षा चालणाऱ्यांवर केंद्रित केला. बसस्थानकातील एका गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना  ऋषिकेश उर्फ सचिन बंडू फड (वय 21) आणि गणेश सुभाष मुंडे (वय 23) दोघेही रा. कन्हेरवाडी ता. परळी  या संशयितांची नावे मिळाली. ज्यावेळी घटनेचा पंचनामा सुरू होता त्यावेळी  हे दोघेही  तेथे उपस्थित होते. मात्र यावेळी  त्यांचे वर्तन संशयास्पद आढळल्यामुळे  पोलिसांनी या दोघांचा शोध घेऊन अटक केली. सुरूवातीला उडवा उडवीची उत्तरे देणाऱ्या संशयितांनी पोलीसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली.