धक्कादायक…..हिंगोली तहसील कार्यालयात भरदिवसा शेतीच्या वादातून एका शेतकऱ्याचा खून

हिंगोली : पोलीसनामा आॅनलाईन

शेतीच्या वादातून एका शेतकऱ्याचा तहसील कार्यालयातच तलवारीचे वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.13) अडीच वाजण्याच्या सुमारास हिंगोली तहसील कार्यालयात घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिंगोली तालुक्यातील सवड येथील नारायण सीताराम राऊत व पहेनी येथील काही शेतकऱ्यांची दंडाधिकारी यांच्याकडे शेतीच्या संदर्भात सुनावणीची तारीख होती. तत्पूर्वी या दोघांमधील वादाला बाहेरच जोरात सुरूवात झाली. यावेळी पहेनी येथील रंगनाथ मोडे याने सुनावणीपूर्वीच नारायण राऊत याला तलवारीने मानेवर वार केले.

या हल्ल्यात नारायण राऊत हे रक्तबंबाळ अवस्थेत गेले असता, त्या ठिकाणी नायब तहसीलदार माधव बोथीकर यांना बोलावून, साहेब मरतो आहे मी मला वाचवा अशी विनंवणी केली. परंतू या घटनेमुळे राऊत रक्तबंबाळ अवस्थेत असल्याने नायब तहसीलदार बोथीकर हादरून गेले. मात्र इतर कोणीही राऊत यांच्या मदतीला धावले नाही. त्यामुळे राऊत यांचा जागीच मृत्यू झाला.

उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पीआय उदयसिंग चंदेल हे दाखल झाले. यावेळी तहसील कार्यालायाच्या आवारात फिरणाऱ्या आरोपीला शस्त्रासह ताब्यात घेतलं. प्रकरणाचा अधिक तपास हिंगोली पोलीस करीत आहेत.