धक्कादायक ! होणाऱ्या नवऱ्याला मारण्यासाठी चक्क वधूने दिल कोल्डड्रिंक्समधून विष

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – येथील यवतमाळमधील एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका नवरी मुलीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला कोल्डड्रिंक्समधून विष दिलं आहे. त्या तरुणीने आपला भाऊ आणि तिच्या एका मैत्रिणीच्या सहाय्याने होणाऱ्या नवऱ्याला कोल्डड्रिंक्समधून विष टाकून त्याला प्यायला दिलं आहे. मात्र सुदैवाने त्या तरुणाने (होणारा नवरा) रुग्णालयात १० दिवस उपचार घेतल्यावर तो बचावला आहे. यामुळे नवरी मुलीचा जीवे मारण्याचा डाव हारला आहे. तरुण ठीक होताच थेट त्याने पोलिसांमध्ये तरुणीविरोधात फिर्याद दिली. यावरून शहरात खळबळ झाली आहे.

अधिक माहितीनुसार, किशोर परसराम राठोड (वय, २३) असे त्या वर तरुणाचे नाव आहे. हा नेर तालुक्यातील कोहळा येथे राहतो. त्याचा विवाह बाभूळगाव तालुक्यातील एका तरुणीशी ठरला होता. लग्नाची तारीख देखील ठरली होती. लग्नाची तारीख जवळ असल्याने तयारी देखील सुरु होती. मात्र, होणाऱ्या नवरीच्या मनात काहीतरी वेगळंच होत. तर आरोपी (नवरी) तरुणीने १ मे रोजी (नवरा) तरुणाला बोलवून घेतली. आणि नवरीचा भाऊ, आणि एक मैत्रिण असे सर्व माळीपुरा येथील कोल्डड्रिंक्सच्या दुकानात गेले. त्यावेळी त्या सर्वांनी नवरा किशोरला कोल्डड्रिंक्स पिण्यास आग्रह केला. बोलत बोलत किशोरचं लक्ष नव्हतं तेव्हा त्या पेयात काहीतरी टाकण्यात आलं. तसेच गोड बोलून त्याला पेय पाजलं.

या दरम्यान, किशोरने कोल्डड्रिंक्स घेतल्यानंतर तो आपल्या मित्रासोबत गाडीवरून घरी जात होता तेवढ्यात त्याला चक्कर येऊन खाली पडला. नंतर किशोरला सोबत असणाऱ्या मित्राने ग्रामीण रुग्णालयात नेले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला डॉक्टरांनी त्याला यवतमाळ रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्या ठिकाणी गेल्यावर तपासणी दरम्यान विष असल्याचे निष्पन्न झाले. यावरून किशोरला त्याच्यासोबत घडलेल्या गोष्टी समजल्या, मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडल्यानंतर किशोरने पोलीस ठाण्यात नवरी मुलगी, आणि अन्य दोघांवर FIR दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.