17 वर्षीय मुलीचा निर्घृण खून ! घराजवळ आढळला ‘त्या’ अवस्थेत मृतदेह, संपुर्ण खेड तालुक्यात प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खेड तालुक्यातील करंज विहिरे परिसरातील थोपटवाडीमध्ये एका 17 वर्षीय मुलीचा खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अद्याप खूनाचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी उशिरा मुलीला मृतदेह निर्जनस्थळी आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

आरती सोपान कलवडे (17) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसयार करंज विहिरे परिसरातील थोपटवाडीमधील मुलीचा भामा आसखेड धरणाच्या कालव्याजवळ निर्जनस्थळी आरतीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. डोक्यात दगड घालुन हा खून करण्यात आला आहे. आरतीच्या घरापासून काही अंतरावर ही घटना घडली आहे. चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून फिर्यादीमध्ये 4 संशयितांची नावे नमुद करण्यात आली आहेत. अद्यापतरी खुनाचे कारण स्पष्ट झालेले नाही. गुन्हयाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक धस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पोलिस युध्दपातळीवर तपास करीत आहेत.