संतापजनक ! पोलिसानेच केला महिलेवर ‘बलात्कार’, दोघांनी ठेवला घराच्या दरवाजावर ‘वॉच’

भुवनेश्वर : वृत्तसंस्था – हैद्राबादमधील महिला डॉक्टरवरील गँग रेप आणि हत्येचं प्रकरण ताजं असतानाच ओडिसातूनही बलात्काराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पोलीस हवालदारासह दोघांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला आहे. ओडिसातील पुरी येथील ही घटना आहे. या घटनेनंतर पीडित महिलेनं पोलिसांत धाव घेतली आहे.

नेमकं काय झालं ?
निमपाडा शहरातील बस स्थानकावर पीडित महिला बसची वाट पहात होती. यावेळी एक अनोळखी व्यक्ती तिच्यापाशी आला आणि तिला मदत करण्याचं आश्वासन दिलं. आपण पोलीस असल्याचं सांगत त्यानं तिला आपलं ओळखपत्रही दाखवलं. तुला जिथे जायचं आहे तिथं सोडतो असं तो महिलेला म्हणाला. ओळखपत्र पाहून महिलेनं त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्या गाडीत बसली. ती गाडीत बसताच आणखी 3 अनोळखी लोकांनी गाडीत प्रवेश केला. त्यानंतर तिला काकटपूरऐवजी ते पुरी येथे घेऊन गेले. यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

अत्याचारावेळी महिलेनं लढवली ‘ही’ शक्कल
महिलेला पुरी येथील एका घरात नेत दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी इतर दोघांनी खोलीला कुलूप लावलं. झाडेश्वरी क्लबजवळच्या पोलीस क्वार्टरमध्ये महिलेवर अत्याचार झाले. महिलेनं स्वत: याबाबत माहिती दिली. पीडित महिलेनं अत्याचार होतानाच एकाच पाकिट काढून घेतलं. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला. पाकिटामुळे आरोपीला शोधणं सोपं झालं. ज्याचं पाकिट होतं त्याला पोलिसांनी अटक केली होती. विशेष म्हणजे ज्याचं हे पाकिट होतं तो एक पोलीस हवालदार आहे. त्याला निलंबित केलं असून इतरांचा शोध सुरू आहे असंही पोलिसांनी सांगितलं. दरम्यान पीडित महिला आणि आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like