परदेशी सप्लायरकडून ३ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोकेन पुरविणाऱ्या परदेशी सप्लायरला अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून ३ कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे.

केनियाचा नागरिक असलेल्या डेव्हिड लेमरॉन ओल तुबूलाई (वय ३३) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलीस खार परिसरात गस्त घातल होते. त्यावेळी संशयितरित्या फिरणार्‍या एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे एक हिरवी पिशवी पोलिसांना मिळाली. त्यानंतर चौकशी करत त्याची झडती घेतल्यावर ५१० ग्रॅम कोकेन पलिसांना मिळाले. पोलिसांनी हे कोकेन जप्त केले असून याची बाजारातील किंमत ३ कोटी ६ लाख रुपये आहे. तो खार, जूहू, वर्सोवा या परिसरात कोकेन सप्लाय करत असल्याचे समोर आले आहे.

Loading...
You might also like