आश्चर्यच ! पुण्यात गायीनं दिला ‘दुतोंडी’ वासराला जन्म, ‘पंचक्रोशीत’ चर्चा अन् बघ्यांची गर्दी

शिरूर : पोलीसनामा ऑनलाईन – तुम्ही सहा बोटे असणारी माणसं पाहिली असतीलच. याशिवाय असेही काही प्राणी पाहिले आहेत ज्यांना एक पाय जास्त असतो. बहुतकरून गायीबद्दल तुम्ही ऐकले असेल की, तिला एक पाय जास्त आहे. अशीच काहीशी पण थोडी वेगळी घटना समोर आली आहे. एका गायीने दोन तोंडं असणाऱ्या वासराला जन्म दिला आहे. डॉक्टरांनी या वासराची तपासणीही केली. या घटनेची खूप चर्चा झाली. या गायीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. दुर्दैवाची बाब अशी की, या वासराचा मृत्यू झाला आहे.

शिरूर तालुक्यातील मलठण गावातील ही घटना आहे. मलठण येथील हरी भक्त परायण संजय सोपान रेणूकदास महाराज यांच्या गाईने काल (बुधवार दि १७ जुलै रोजी) या वासराला जन्म दिला होता. दुसऱ्या तोंडाला अन्ननलिका नसल्याने ते जिवंत राहू शकणार नाही असे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितले होते. पंचक्रोशीत या वासराची चांगलीच चर्चा झाली. या वासराला पहायला मलठणमध्ये मोठी गर्दी झाली होती. या दोन तोंडं असणाऱ्या वासराचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले जे सोशलवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. अनेकांना याबाबत कुतूहल वाटले होते.

या दोन तोंडं असणाऱ्या वासराचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आजही त्या वासराला पहायला लोक गर्दी करत होते. परंतु वारसाच्या मृत्यूने अनेकांचा अपेक्षाभंग झाला.

You might also like