धक्कादायक… कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

गणेशखिंड रोडवरील कॉसमॉस बँकेच्या एटीएम स्विच (सर्व्हर) वर सायबर हल्ला झाला असून हॅकरने जवळपास १५ हजाराहून अधिक व्यवहार करुन व्हीसा आणि रुपे कार्डद्वारे ९४ कोटी ४२ लाख रुपये हाँगकाँगला हस्तांतरीत केले आहेत. ही घटना ११ आॅगस्टला दुपारी ३ ते रात्री १० आणि १३ आॅगस्टला सकाळी साडेअकरा वाजता गणेशखिंड येथील कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयात घडली आहे.

[amazon_link asins=’B01GRI6Q3I’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’13826c52-9f73-11e8-b14d-d976195c67f2′]

याप्रकरणी सुहास सुभाष गोखले (वय ५३, रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, कॉसमॉस बँकेचे गणेशखिंड रोडवर कॉसमॉस टॉवर येथे मुख्यालय आहे. तेथे असलेल्या एटीएम स्विच (सर्व्हर) वर कोणीतरी मालवेअरचा अटॅक करुन बँकेच्या काही व्हिसा व रुपी डेबीट कार्डधारकांची माहिती चोरुन त्याद्वारे व्हिसाचे अंदाजे १२ हजार व्यवहार करुन ७८ कोटी रुपये भारताबाहेर झाले आहेत. तसेच रुपे कार्डचे २ हजार ८४९ व्यवहाराद्वारे  २ कोटी ५० लाख रुपयांचे भारताबाहेर झाले आहेत़. असे एकूण १४ हजार ८४९ व्यवहार व्हिसा व एन पी सी आय यांनी पाठविलेल्या ट्रान्झॅक्शन रिक्वेस्टस व्हिसा व  एन. पी. सी. आय यांना या ट्रान्झॅक्शन कॉसमॉस बँकेने अप्रुव्ह केल्याचे भासवून कोणी तरी त्या अप्रुव्ह केल्याचे भासवून त्याद्वारे ८० कोटी रुपये काढून घेतले होते. हे सर्व व्यवहार ११ आॅगस्ट रोजी दुपारी ३ ते रात्री १० या वेळेत घडले.

त्यानंतर सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता हॅकरने स्विफ्ट ट्रान्झॅक्शन रिक्वेस्टस व्हिासा व इनिशिएट करुन हाँगकॉंग येथील हॅनसेंग बँकेच्या ए़ एल. एम. ट्रडिंग लिमिटेड यांच्या बँक खात्यावर १३ कोटी ९२ लाख रुपये जमा करुन ते काढून घेतले. अशा प्रकारे हॅकरने तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपयांचा कॉसमॉस बँकेला गंडा घातला असून या सर्व प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.