खळबळजनक ! ‘तुझा आणि बहिणीचा डिप्रेशनमुळं मृत्यू व्हावा, आईचा बलात्कार व्हावा’, आलिया भटच्या बहिणीला येतायेत विकृत मेसेज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार आलिया भटची बहिण शाहीन भट हिनं नकुतेच तिच्या इंस्टा स्टोरीला काही स्क्रीनशॉट शेअर केले होते. हे काही चॅट्सचे स्क्रीनशॉट होते. यात काही लोक तिच्यासोबत आणि कुटुंबासोबत काही वाईट घडावं असं बोलते होते. एकानं ती डिप्रेशनमध्ये गेली पाहिजे असं म्हटलं तर एकानं तिची आई सोनी राजदानवर बलात्कार झला पाहिजे असं म्हटलं. सर्वच चॅट्सचे स्क्रीनशॉट शेअर करत शाहीननं सांगितलं की, ती सर्वांविरोधात आता कायदेशीर कारवाई करणार आहे.

शाहीननं तिच्या इंस्टा स्टोरी अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या. यात तिनं बलात्कार आणि घरगुती हिंसेवर भाष्य केलं होतं. याशिवाय काही चॅट्सचे स्क्रीनशॉटही शेअर केले होते. यात एकानं लिहिलं होतं की, “मी आशा करतो की, तुझा आणि तुझ्या बहिणीचा मृत्यू डिप्रेशनमुळं व्हावा. तुझ्या वडिलांचा मृत्यू कॅन्सरनं व्हावा. तुम्हा लोकांचे प्रेत मुंग्या आणि सापानं खाऊन टाकावं. शाहीन तू कल्पना कर की, तू डिप्रेशनची शिकार झाली आहेस. खूप वाईट स्थितीत आहेस. तू अंथरूणातून उठू शकणार नाहीस. काहीच बोलू शकणार नाहीस.” आणखी एकानं लिहिलं होतं की, तिच्या आईचा म्हणजेच सोनी राजदानचा बलात्कार व्हावा.

शाहीननं हे सारे स्क्रीनशॉट शेअर करत कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर असं विकृत कोणी वागत असेल त्याच्याविरोधातही ती कारवाई करेल असंही तिनं सांगितलं होतं.