धक्कादायक ! अल्पवयीन विद्यार्थीनीवर ४ कंडक्टरचा सामुहिक बलात्कार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – एका अल्पवयीन विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेच्या स्टार बसचे चार कंडक्टर गेले सात महिने हा प्रकार करीत असून मानकापूर पोलिसांनी या चारही कंडक्टरांना अटक केली आहे.

आशिष काशिनाथ लोखंडे (वय २५, रा. पूजा रेसिडेन्सी, कोराडी मार्ग), उमेश ऊर्फ वर्षपाल मोरेश्वर मेश्राम (वय २२), धर्मपाल दादाराव मेश्राम (वय २२) आणि शैलेश ईश्वर वंजारी (वय ३१, रा. पारडी) अशी अटक करण्यात आलेल्या स्टारबस कंडक्टरची नावे आहेत. आरोपी मूळचे पारशिवनीच्या इटगावचे रहिवासी आहेत. ज्या फ्लॅटवर या आरोपींनी हे कुकर्म केले तो फ्लॅट एका पोलीस अधिकाऱ्याचा असून त्याने तो भाड्याने दिला होता, अशी माहिती समोर आली आहे.

पीडित १६ वर्षीय अल्पवयीन ११ वीची विद्यार्थिनी आहे. ती सीताबर्डीच्या एका कनिष्ठ महाविद्यालयात शिकते. ती स्टारबसने महाविद्यालयात ये-जा करते. तिची जुलै २०१८ मध्ये स्टार बसचा कंडक्टर धर्मपाल मेश्रामशी ओळख झाली. धर्मपालने आपली ओळख लपविण्यासाठी आपले नाव अतुल असे सांगितले. दोघांनीही एकमेकांना आपला मोबाईल क्रमांक दिला. धर्मपाल विद्यार्थिनीला कोराडी मार्गावरील अ‍ॅलेक्सीस हॉस्पिटलजवळील पूजा रेसिडेन्सीमध्ये आशिष लोखंडे याच्या फ्लॅटवर घेऊन गेला. आशिषने हा फ्लॅट भाड्याने घेतला आहे. धर्मपालने आशिषच्या फ्लॅटवर या विद्यार्थिनीवर अत्याचार केला. जवळपास महिनाभर धर्मपालने अनेकदा तिच्यावर या फ्लॅटमध्ये अत्याचार केला.

ऑगस्ट महिन्यात शैलेश वंजारीने या विद्यार्थिनीला फोन करून तू अतुलला ओळखते काय असे विचारले. तिने ओळखत असल्याचे सांगितल्यावर त्याने तिला सीताबर्डीत भेटण्यासाठी बोलावले. शैलेशही तिला पूजा रेसिडेन्सी येथे घेऊन गेला. तेथे त्याने धर्मपालला बोलावले. दोघांनीही तिच्यावर अत्याचार केला. दिवाळी असल्यामुळे विद्यार्थिनीचे महाविद्यालयात येणे कमी झाले. दरम्यान आशिषने विद्यार्थिनीशी संपर्क साधला. त्यानेही तिला भेटण्यासाठी सीताबर्डीत बोलावून त्या फ्लॅटवर नेले. आशिषने धर्मपाल, शैलेशलाही फ्लॅटवर बोलावले. तेथे तिघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर उमेश या विद्यार्थिनीच्या संपर्कात आला. त्याच्या आधी विद्यार्थिनी धर्मपाल, आशिष आणि शैलेशच्या शोषणाला बळी पडली होती. विद्यार्थिनीने उमेशपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार उमेशने तिला लग्नाचे आमिष दाखविले. तो तिला कन्हान येथील आपल्या भावजीच्या घरी नेले. तेथे तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर मेडिकल चौक येथे राहणाऱ्या गर्लफ्रेंडच्या घरी नेले. तेथेही तिच्यावर अत्याचार केला.

तिचे आईवडील मजुरी करतात. सात महिने हा अत्याचार सहन केल्यावर तिला आपण गर्भवती असल्याची शंका आली. बदनामीच्या भीतीने ती २८ फेब्रुवारीला घरातून निघून गेली. कुटुंबीयांनी यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये ती रेल्वे पोलिसांच्या हाती सापडली. त्यानंतर तिने आपली व्यथा तिथल्या ‘चाईल्ड लाईन’ या अल्पवयीन मुलांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेपुढे मांडली. रायपूर रेल्वे पोलिसांनी नागपूर पोलिसांकडे या प्रकरणाची सर्व माहिती दिली. पोलिसांनी विद्यार्थिनीला रायपूरवरून नागपूरला आणले. तिची चौकशी केली असता तिने नागपूरवरून डोंगरगडला गेल्याचे सांगितले. डोंगरगडमध्ये एका युवकाने तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगितले. घरातून पळून जाण्याचे कारण विचारले असता तिने स्टार बसच्या कंडक्टरने केलेल्या अत्याचाराची माहिती दिली. यशोधरानगर पोलिसांनी सामूहिक अत्याचाराचा आणि बाल अत्याचार संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. या घटनेमुळे नागपूरात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे त्याची दखल घेत स्टार बसने आरोपींना नोकरीवरून काढले.

दरम्यान, सामूहिक अत्याचार करण्यात आलेला फ्लॅट एका पोलीस अधिकाऱ्याचा आहे. हा अधिकारी नांदेडमध्ये नोकरीवर आहे. आशिष दोन वर्षांपासून या अपार्टमेंटमध्ये राहतो. वर्षभरापूर्वी तो या अधिकाऱ्याच्या फ्लॅटमध्ये राहावयास आला. पोलीस अधिकाऱ्याने कोणतीही चौकशी न करता फ्लॅट भाड्याने दिल्याची माहिती पुढे आली आहे.

महत्वाच्या बातम्या –

Loading...
You might also like