धक्कादायक ! लग्नानंतर अवघ्या २० दिवसातच ‘त्या’ अभियंत्याचा मृत्यू

संचालक गंगाधर म्हमाणे यांना पुत्रशोक

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मुतखड्याचा त्रास होऊन लग्नानंतर अवघ्या २० दिवसात अभियंत्याचा मृत्यु झाला. श्रीशैल गंगाधर म्हमाणे (रा. शेटेवस्ती, सोलापूर) हे या अभियंत्याचे नाव आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक गंगाधर म्हमाणे यांचा ते पुत्र होत.

श्रीशैल याचा २४ एप्रिल रोजी सोलापूरातील एका मंगल कार्यालयात विवाह झाला होता. त्याला मुतखड्याचा त्रास होता. हा त्रास वाढल्याने श्रीशैल याला मंगळवारी सोलापूरतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे तपासणी केल्यावर त्याच्या किडनीला सूज आल्याने मुत्राशयात जंतूसंसर्ग झाल्याने आढळून आले. उपचार सुरु असतानाच बुधवारी त्याचे निधन झाले.
श्रीशैल याच्या विवाहासाठी पुणे व राज्यभरातून नातेवाईक, परिचित आले होते. काही दिवसांपूर्वी ज्याच्या विवाहाला उपस्थित होतो, त्या श्रीशैल याच्या निधनाच्या वृत्तावर अनेकांना विश्वास ठेवणे अवघड जात होते. लग्नानंतर आकस्मिक मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Loading...
You might also like