Yavatmal News : नेर येथे अपघातात माजी सैनिकाचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बुधवारी सकाळी ५.३० वाजता बाभूळगाव मार्गावर अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार माजी सैनिक ठार झाला. किशोर भाऊराव जगताप (४७) रा. नेर असे मृताचे नाव आहे. दरम्यान, सकाळी फिरायला गेलेल्या नागरिकांना हा प्रकार आढळून आला.

सध्या किशोर जगताप हे सध्या भारतीय स्टेट बॅंकेच्या दारव्हा शाखेत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. सकाळी बाभूळगाव रोडवर असलेल्या शेतात एमएच-२९-बीजे- ९८५८ क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. सावंगाजवळ ते मृतावस्थेत आढळले.

अपघात नेमका कशामुळे झाला हे कळू शकले नाही.त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे. ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे, पोलीस कर्मचारी राजेश भगत, नरेंद्र लाहोरे, भारत पाटील यांनी पोलीस कारवाई पार पाडली.