धक्कादायक ! पुण्यात 14 वर्षाच्या मुलीचा ‘बालविवाह’, बापासह आत्याविरूध्द FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बालविवाहाला बंदी असतानाही पिंपरी-चिंचवड सारख्या प्रगतशील भागातील एका मद्यपी बापन आणि आत्यानं 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीच लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मुलीच्या मावशीन हा प्रकार उघडकीस आणत पोलीसांकडे तक्रार दिली आहे. वडिल, आत्या, भटजी व सांगली येथील व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मावळ तालुक्यातील सोमाटणे 24 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राजु गुलाब सरोदे, अंजना गुलाब सरोदे (रा. सोमाटणे, ता. मावळ), सुनिता (रा. हडपसर), जिवन पाटील, भडजी, सागर गायकवाड (रा. लाडेगाव, ता. मावळ, जि. सांगली) यांच्यावर बाल विवाह प्रतिबंध कायदा कलम 9, 10, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटूंबियासह तळेगाव परिसरात राहण्यास आहे. तिच्या वडिलांना दारूचे व्यसन असून, मिळेल ते कामधंदा करतात. दरम्यान, मुलीची आत्या हडपसर परिसरात राहण्यास आहे. दरम्यान, वडिल आणि आत्यांनी संगणत करून सांगली येथील वयाने मोठा असणार्‍या एका मुलाशी संगणमतकरून विवाह लावून दिला. त्यानंतर काही दिवसांनीच वयाने 14 वर्षाची असणार्‍या भाच्चीचे लग्न तिच्या वडिल आणि आत्याने बळजबरीने लावून दिल्याची माहिती फिर्यादी यांना मिळाली.

त्यानंतर त्यांनी याची माहिती घेतली. त्यावेळी हे लग्न गुपचूप लावून देण्यात आल्याचे समोर आले. यानंतर त्यांनी तळेगाव पोलीसांकडे तक्रार दिली. तळेगाव पोलीसांनी याची प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर यातील आरोपींवर गुन्हा दाखलकरून हा प्रकार हडपसर भागात घडल्याने तपासासाठी हडपसर पोलीसांकडे गुन्हा वर्ग केला आहे.

लग्न हडपसरला लागल्याची शक्यता…
नातेवाईक हडपसर परिसरात राहण्यास आहेत. त्यामुळे या मुलीच्या लग्न कार्याची सुरूवात हडपसरमध्ये झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे हडपसर पोलीसांकडे हा गुन्हा वर्ग केला आहे. दरम्यान, आरोपी सांगलीत असल्याची माहिती मिळाल्याने हडपसर पोलीसांचे पथक आरोपींच्या शोधासाठी गेल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, वडिल आणि आत्याने केवळ वयाने 14 वर्षाच्या मुलीचे लग्न इतक्या घाईत का लावून दिले, याचा तपास पोलीस करत आहेत. यातून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like