धक्कादायक ! कोरोना लस देण्याचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार

पटणा : पोलीसनामा ऑनलाइन –   देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दुसरीकडे लसीकरण मोहीम सुरु आहे. ही लस देण्याच्या आमिषातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना बिहारमध्ये घडली. कोरोना लस देण्याच्या बहाण्याने एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

बिहारमधील जमुनापूर परिसरात राहणाऱ्या एका तरुणीला आरोपीने कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे आमिष दाखवून जमुनापूर भागातील एका घरात नेले. या ठिकाणी दोघांनी पीडित तरुणीसोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. पीडित तरुणीने याला विरोध केला. तेव्हा आरोपींनी तिचे हात-पाय घट्ट बांधले. तिच्या तोंडात रुमालही कोंबला. त्यानंतर या दोन्ही आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. पीडित तरुणीने आपली सुटका केली आणि घरी पोहोचली. तिने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती कुटुंबियांना दिली. त्यानंतर जमुनापूर पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली.

दरम्यान, जमुनापूर परिसरात या दोन आरोपींनी पीडित तरुणीसोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. पीडित तरुणीने याला विरोध केला. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या गंभीर घटनेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अधिक तपास केला. त्यानंतर फरार झालेल्या दोन आरोपींना अटक केली.