धक्‍कादायक ! ‘तुला पाहते रे’ फेम ईशा उर्फ गायत्री दातारला ‘त्या’ महिलेचा अश्लील मॅसेज

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – प्रेक्षकांची सगळ्यात आवडत्या ‘तुला पाहते रे’ या मालिकेने सर्व प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ही मालिका संपल्यामुळे अनेक प्रेक्षक नाराज झाले आहे. कारण या मालिकेमधील ईशा निमकर आणि विक्रांत सरंजामे या भूमिकेने सगळ्या चाहत्यांचे मन जिंकले होते. चाहते उत्साहाने ही मालिका पाहत होते. या मालिकेने निरोप घेतल्यामुळे सर्व चाहते सोशल मिडियावर दु:ख व्यक्त करत आहे. याच दरम्यान ईशा गुप्ताची भूमिका साकारणारी गायत्री दातार हीला एक वेगळाच अनुभव आला आहे. तिला चक्क एका महिलेने फेसबुकवर अश्लील भाषेत मेसेज केला आहे.

त्या महिलेने फेसबुकवर पाठविलेला मेसेज गायत्रीने आपल्या सोशल मिडियाच्या अकाउंटवर शेअर केला आहे. गायत्रीला पाठविलेला मेसेज अतिशय अश्लील असून त्या महिलेचे अकाउंट खरे आणि की खोटे हे अद्याप समजले नाही. हा अश्लील मेसेज इन्स्टाग्रामवर शेअर करुन गायत्रीने लिहले की, नुकताच हा मेसेज फेसबुक पेजवर वाचला आणि मला हे वाचून धक्का बसला. हे असे बोलण्याची गरज आहे का ? हे बरोबर आहे का ?

गायत्रीने पुढे लिहले की, मी हा मेसेज प्रमोट करत नाही किंवा मला कोणाकडून मेसेज यावा असाही मेसेज शेअर करण्याचा अर्थ नाही. इथे त्या व्यक्तीचे फेसबुक अकाउंट आहे. या महिलेविरोधात रिपोर्ट करा. आपण आपली पावर दाखवून देऊ. ‘तुला पाहते रे’ नंतर गायत्री दातार आता पहिल्यांदाच निम्मा शिम्मा राक्षस या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. गायत्री यामध्ये शहजादीची भूमिका साकारणार आहे. याशिवाय ती कोल्हापूर डायरिज चित्रपटात झळकणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त