धक्कादायक… मिरचीची धुरी देऊन मुलीसोबत वडील व इतरांनी केले लैंगिक अत्याचार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

सामूहिक लैंगिक अत्याचार, अनैसर्गिक कृत्य आणि पीडित मुलीचा मृत्यू, सात वर्षाच्या मुलीचे अपहरण करून खून, वर्ग शिक्षकाकडून अत्याचार, अपहरण चार वर्षाच्या मुलीसोबत लैंगिक अत्याचार ही सगळी प्रकरणे ताजी असताना वाकड पोलीस ठाण्यात आणखी एक धक्कादायक गुन्हा दाखल झाला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a48bc0c7-c785-11e8-a606-e360bda8e898′]

पोटच्या बारा वर्षीय मुलीवर थेरगाव येथे नराधम बापाने गेल्या दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे या मुलीवर हैदराबाद येथे चालत्या रेल्वेत, सोलापूर रेल्वेस्टेशनवर देखील अत्याचार झाला असून, तिला नग्न करून मिरचीची धुरी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांना भरारी पथकाला घाबरून कैद्याने गिळला मोबाईल

याप्रकरणी कांदिवली मुंबई येथील एका सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींनी मुंबईत फिर्याद दिली. तेथून ती पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात वाकड पोलिस ठाण्यात दाखल झाली. सन २०१६ ला सुरवातीला हा प्रकार थेरगाव येथे घडल्याने हा गुन्हा तपासासाठी वाकड पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेवर २०१६ मध्ये आणि आत्ता २०१८ मध्ये बापानेच लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर २०१७ मध्ये पीडितेच्या नातेवाईक महिलेने व तिच्या मुलाने पीडितेला हैदराबाद येथील घरात नग्न करून मिरचीची धूरी दिली. तसेच मारहाण केली. त्यानंतर सन २०१७ मध्येच या पीडितेवर गालावर जळाल्याची खूण असलेल्या एका अपंग व्यक्तीने हैदराबाद मध्ये चालत्या रेल्वेत लैंगिक अत्याचार केला. त्याचबरोबर सोलापूर रेल्वेस्थानकात देखील या मुलीवर एक हात लहान असलेल्या अनोळखी व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B00ZNCBQ9O’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b9a05e3e-c786-11e8-8c16-61c4985514d1′]

अवघ्या बारा वर्षाच्या मुलीसोबत बापानेच लैंगिक अत्याचाराला सुरुवात केली. त्यानंतर नातेवाईक महिलेने आणि तिच्या मुलाने घृणास्पद कृत्य केले. यानंतर चक्क समाजातील विकृती असणाऱ्याने चालत्या रेल्वेतच अत्याचार केले. पीडित मुलगी मुंबई येथे आल्यानंतर एका सामाजिक संस्थेच्या महिला पदाधिकाऱ्याच्या संशय आला. तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता हा सगळा धक्कादायक आणि घृणास्पद प्रकार समोर आला. तपास सहाय्यक निरीक्षक स्वामी करीत आहेत.