धक्कादायक ! प्रियकराच्या मित्रांनी शरीसंबंधांसाठी केली जबरदस्ती, नकार देताच तरुणीचा चाकूने भोसकून केला खून

लखनौ : वृत्त संस्था – प्रियकराच्या मित्रांनीच तरुणीवर जबरदस्ती (Forcing the young woman) करण्याचा प्रयत्न करुन तरुणीचा खून (Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र तिने नकार देताच या नराधमांनी चाकूने भोसकून तिच्या खून (murder her with a knife) केला. आरोपीने चाकूने तरुणीच्या शरीराची चाळण केली. अखेरीस चाकू तिच्या मणक्यामध्ये अडकला, त्यावेळी आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनौमधील (Lucknow) सरोजिनीनगर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला असून या प्रकरणी तिच्या प्रियकरासह 3 जणांना अटक (Arrest)  केली आहे मोहम्मद कैफ, आकाश कश्यप आणि विशाल कश्यप असे अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी मूळची सीतापूर येथील राहणारी असून सध्या ती स्कूटर इंडिया येथे वास्तव्यास होती. तर तिचा प्रियकर मोहम्मद कैफ सरोजीनीनगरमध्ये राहत होता. गेल्या महिनाभरापासून ती तरुणी मोहम्मद कैफ याच्याशी बोलत होती. 12 जून रोजी तरुणीने मोहम्मद कैफला फोन करून सांगितले की, तिचे वडील घरी नाहीत, तर आई गावात गेली आहे. हे समजल्यावर कैफने तिला बाहेर फिरायला जाण्यासाठी तयार केले. मोहम्मद हा आकाश आणि विशाल या मित्रांसमोरच तिच्याशी बोलत होता.

तिथेच मोहम्मदच्या मित्रांनी तरुणीवर जबरदस्ती करण्याचा कट रचला. त्यानंतर मोहम्मद त्या तरुणीला घेऊन नवोदय विद्यालयाच्या समोरील निर्जनस्थळी घेऊन गेला. थोड्यावेळाने विशाल अन् आकाशही त्याठिकाणी पोहचले. तिथे त्यांनी या तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ही तरुणी मदतीसाठी आरडाओरडा करू लागली. तेव्हा आकाश अने विशालने तिला पकडले. त्यानंतर विशालने तिच्या पाठीत चाकू खूपसला. तेव्हा ही तरुणी जीव वाचवण्यासाठी कच्च्या रस्त्याच्या दिशेने धावत सुटली. मात्र या तिघांनीही तिचा पाठलाग करून तिला पकडून ओढणीने गळा आवळून खून केला. घटनेनंतर तिघेही आरोपी पसार झाले आहेत.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : Shocking! Girlfriend stabs girl to death for refusing to have romance

हे देखील वाचा

कोण आहेत सुल्तान अन्सारी ज्यांनी दहा मिनिटात राम मंदिर ट्रस्टकडून कमावले साडे 16 कोटी; जाणून घ्या

आता मुंबईत झाडांवर होणार ‘उपचार’, BMC ने नियुक्त केला ’डॉक्टर’; देशात पहिल्यांदा झाले असे

व्हॅक्सीनेशनसाठी आहात अस्वस्थ, आता Paytm वरून बुक होईल व्हॅक्सीन घेण्यासाठी स्लॉट; जाणून घ्या

15 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे बदलणार नशीब, खिशात येईल पैसा, इतरांसाठी असा आहे मंगळवार

Covid Update : 76 दिवसानंतर आढळल्या कोरोनाच्या सर्वात कमी केस, 24 तासात 2726 रूग्णांचा झाला मृत्यू